छापा पडताच कत्तल करणारे पळाले; गोरक्षकांमुळे १२ जनावरांना मिळाले जिवदान
By संताजी शिंदे | Updated: July 2, 2023 16:07 IST2023-07-02T16:05:54+5:302023-07-02T16:07:31+5:30
या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

छापा पडताच कत्तल करणारे पळाले; गोरक्षकांमुळे १२ जनावरांना मिळाले जिवदान
संताजी शिंदे, सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील इटकळ निलेगाव येथे अचानक धाड टाकताच, जनावरांची कत्तल करणारे पळून गेले. गोरक्षकांनी तेथील १२ जनवारांना ताब्यात घेतले, या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गोरक्षक दिनेश धनके यांना इटकळ निलेगाव येथे गोवंशाची कत्तल सुरू आहे अशी माहिती मिळाली. माहितीवरून धनके यांनी सोलापुरातील बजरंग दलातील गोरक्षकांशी संपर्क साधला. मानद पशुकल्याण अधिकारी प्रशांत परदेशी धाराशिव येथील पोलिस उपअधीक्षक नवनीत कावत यांना माहिती दिली. पोलिसांनी मदतीने इटकळ येथे गोरक्षकांनी छापा टाकला, तेव्हां काही लोक जनावरांच्या कत्तली करीत होत्या. गोरक्षकांना पाहताच कत्तली करणारे तेथून पळून गेले. पत्रा शेडमध्ये खिलार गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सोलापुरातील प्रसिद्ध गोसेवक गोपाळ सोमानी यांच्याशी संपर्क साधून जनावरांची माहिती सांगितली. तेव्हा त्यांनी एक टेम्पो पाठवून दिला, त्यानंतर सर्व जनावरे बार्शी रोडवरील अहिंसा गोशाळेत पाठवण्यात आले. कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव पोलीस उपअधीक्षक नवनीत कावत, महेश भंडारी, गोपाल सोमानी, पाेलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, एपीआय तायवडे बजरंग दल गोरक्षा विभाग जिल्हाप्रमुख प्रशांत परदेशी, तुळजापूर येथील दिनेश धनके, सतीश सिरसिल्ला, योगीराज जडगोणार, पवन कुमार कोमटी, विरेश मंचाल आदींचे सहकार्य लाभले.