शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतात पाण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यावर तुटून पडली मोकाट कुत्री; सैफुल परिसरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:42 IST

सोलापूर : सैफुल परिसरातील रेणुका नगराजवळील आजोबासमवेत शेतात गेलेल्या चार वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले.  ...

ठळक मुद्देओमप्रकाश याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन तेथे आई-वडिलांनी  मुलाची अवस्था पाहून हंबरडा फोडलाओमप्रकाशचे रक्ताने भरलेले कपडे आणि जमिनीवर कुत्र्यांनी लोळवल्याने झालेली अवस्था पाहून उपस्थितही हेलावून गेले

सोलापूर : सैफुल परिसरातील रेणुका नगराजवळील आजोबासमवेत शेतात गेलेल्या चार वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. 

ओमप्रकाश चुंगी (वय-४, रा. रेणुकानगर) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. ओमप्रकाश चुंगी हा गणेश नाईक बालक मंदिर, प्राथमिक शाळेच्या बालवाडीमध्ये शिकतो. बुधवारी बालवाडीला सुट्टी देण्यात आली होती. आईवडील दोघेही कामाला असल्याने ओमप्रकाश याला रेणुकानगर येथे असलेल्या शेतात काम करणाºया आजी-आजोबांकडे सोडण्यात आले होते.  आजोबा पाणी आणण्यासाठी शेतातील हौदाकडे जात होते. पाठोपाठ ओमप्रकाशही गेला. हौदात पाणी नसल्याने आजोबा यांनी जवळच असलेल्या विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. आजोबा ओमप्रकाशला हौदाजवळ थांबवून विहिरीत उतरले. 

अचानक पाच मोकाट कुत्रे पाण्याच्या हौदाजवळ आले, त्यांनी ओमप्रकाशवर हल्ला करून चावा घेण्यास सुरूवात केली. ओमप्रकाश मोठ्याने ओरडू लागला, हा आवाज ऐकून परिसरातील लोक हौदाच्या दिशेने धावले. तेव्हा मोकाट कुत्रे ओमप्रकाशचे लचके तोडत होते. लोकांनी कुत्र्यांना काठीने मारण्यास सुरूवात केली मात्र ते ओमप्रकाशला सोडत नव्हते. 

उलट कुत्र्यांनी जंगलातील हिंस्त्रप्राण्यांप्रमाणे फरफटत नेण्यास सुरूवात केली. तेव्हा लोकांनी कुत्र्याला काठीने जोरात मारण्यास सुरूवात केल्यानंतर ओमप्रकाशला सोडून पळून गेले. शेताचे मालक मनपा परिवहन समिती सदस्य नितीन भोपळे यांनी तत्काळ ओमप्रकाश याला शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. 

आईने फोडला हंबरडा...- ओमप्रकाश याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन तेथे आई-वडिलांनी  मुलाची अवस्था पाहून हंबरडा फोडला. ओमप्रकाशचे रक्ताने भरलेले कपडे आणि जमिनीवर कुत्र्यांनी लोळवल्याने झालेली अवस्था पाहून उपस्थितही हेलावून गेले.

टॅग्स :Solapurसोलापूरdogकुत्राSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य