शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शांततेसाठी थायलंडने धाडली सोलापूरसाठी बुद्धमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:56 IST

नालंदा बुद्धविहारात स्थापना : जागतिक शांतीसाठी उचलले पाऊल

ठळक मुद्देबुद्धांचा धम्म हा विश्व कल्याणाचा मार्ग - भन्ते बी. सारीपुत्तथायलंड ते सोलापूर हा हजारो मैलाचा प्रवासाचा टप्पा पारही मूर्ती २२५ किलोग्रॅम वजनाची असून साडेसहा फूट उंचीची आहे.

सोलापूर : थायलंड सरकारने जागतिक शांततेसाठी प्रयत्न सुरू केले असून, यासाठी ते विविध देशांना  गौतम बुध्दांची मूर्ती भेट देत आहेत. बुध्दांना करूणाशील म्हणून संबोधले जाते. त्यांनी मानवाला शांतीचा संदेश दिला. हाच संदेश देशादेशात पोहोचण्यासाठी थायलंडने हे पाऊल उचलले असून. तेथून आलेल्या बुध्दमूर्तीची विजापूर रोडवरील नालंदा बुध्द विहारात भन्ते बी. सारीपुत्त यांच्या हस्ते रविवारी स्थापना झाली.

थायलंडवरून ही मूर्ती सोलापुरात आली असली तरी या मूर्तीचा प्रवास आणि ती येथे आणण्यामागील भावनाही तेवढीच महत्त्वाची आहे. नालंदा नगरातील या बुद्धविहाराशी संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मूर्ती २२५ किलोग्रॅम वजनाची असून साडेसहा फूट उंचीची आहे.

अर्धोन्मलित नेत्र आणि ध्यानमुद्रेत असणाºया या मूर्तीच्या चेहºयावरील धीरगंभीर भाव, तेज, शांती आणि प्रसन्नता पाहिल्यावर मन शांत होते. जगाला शांतीचा संदेश देणाºया गौतम बुद्धांच्या या मूर्तीला सोन्याचा मुलामा असून अत्यंत आकर्षक असलेली ही मूर्ती तेवढीच देखणीही आहे. सध्या सुरू असलेल्या वर्षावासात सोलापुरात आणलेली ही बुद्धमूर्ती समाजाला शांतीचा संदेश देईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

असा झाला मूर्तीचा प्रवास...- थायलंड ते सोलापूर हा हजारो मैलाचा प्रवासाचा टप्पा पार करून गौतम बुद्धांची मूर्ती सोलापुरात पोहोचली कशी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी थायलंड सरकारने या मूर्ती मोफत देण्याची योजना आखली आहे. गुजरातमधील संघकाया फाउंडेशनच्या माध्यमातून अशा अनेक मूर्ती भारतात आल्या आहेत.

थायलंडवरून अत्यंत काळजीपूर्वक या मूर्ती बोटीने मुंबईत आणल्या जातात. तेथून कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यावर संघकाया फाउंडेशनच्या माध्यमातून आधी ठरल्यानुसार या मूर्ती संबंधित संस्था अथवा मंडळांना सोपविल्या जातात. सोलापुरात आणलेल्या या मूर्तीचा प्रवासही असा झाला असून कल्याणमधील वाशिदवरून ही मूर्ती ट्रकमधून सोलापुरात आणण्यात आली. त्यानंतर ती नालंदा बुद्धविहारात स्थापन करण्यात आली.

बुद्धांचा धम्म हा विश्व कल्याणाचा मार्ग - भन्ते बी. सारीपुत्त- तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश आणि दिलेला धम्म हा विश्व कल्याणाचा मार्ग आहे. बुद्ध धम्माचे आचरण केल्यास प्रत्येकास समाधान लाभेल, असे प्रतिपादन भन्ते बी. सारीपुत्त यांनी नालंदा बुद्धविहारातील मूर्तीच्या स्थापनेप्रसंगी केले. भन्ते सारीपुत्त यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बुद्धवंदना करण्यात आली. माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक अरुण भालेराव, अजित गायकवाड, बसपाचे राज्य प्रभारी संजीव सदाफुले, बौध्द महासभेचे अण्णासाहेब वाघमारे, धम्मरक्षिता कांबळे, प्रा. डॉ संघप्रकाश दुड्डे, बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, बुद्धविहार संस्थेचे अध्यक्ष शरद वाघमारे, जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षा माया लोंढे उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरBuddha Cavesबौद्ध लेणीMumbaiमुंबईThailandथायलंड