मोहोळजवळ मोटारसायकल-कार अपघातात भाऊ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST2021-06-22T04:16:18+5:302021-06-22T04:16:18+5:30

मोहोळ : मुलीला स्थळ पाहण्यासाठी गेलेल्या दोन भावांच्या मोटारसायकलला कारने धडक दिली. या अपघातात एका भावाचा जागीच मृत्यू ...

Brother killed in motorcycle-car accident near Mohol | मोहोळजवळ मोटारसायकल-कार अपघातात भाऊ ठार

मोहोळजवळ मोटारसायकल-कार अपघातात भाऊ ठार

मोहोळ : मुलीला स्थळ पाहण्यासाठी गेलेल्या दोन भावांच्या मोटारसायकलला कारने धडक दिली. या अपघातात एका भावाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

सुरेश सदाशिव लाळगे (वय ६०, रा. तांबोळे, ता. मोहोळ), असे अपघातात मरण पावलेल्याचे नाव असून, मोहोळजवळ कचरे पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान हा अपघात झाला.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार सुरेश सदाशिव लाळगे (वय ६०) व त्यांचे भाऊ सत्यवान सदाशिव लाळगे (वय ५५) हे दोघे मोटारसायकल (एमएच क्रमांक १३ एएच ४७७२)ने इंदापूर येथे मुलीला स्थळ पाहण्यासाठी गेले होते. तेथे नातेवाइकांना भेटून सायंकाळी सहा वाजेदरम्यान दोघेही मोहोळजवळ कचरे पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल भरून मोहोळच्या दिशेने येत असताना पुण्याहून मोहोळच्या दिशेने जाणाऱ्या विना क्रमांकाच्या कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात सुरेश लाळगे गंभीर जखमी होऊन ते जागीच मरण पावले. पाठीमागे बसलेले सत्यवान लाळगे हे गंभीर जखमी झाले.

त्यांना राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी कार चालक रमेश तानाजी पवार (रा. सिकंदराबाद, हैदराबाद) याच्या विरोधात स्वागत लाळगे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश शिंदे करीत आहेत.

Web Title: Brother killed in motorcycle-car accident near Mohol