वीट खून प्रकरण, संशयिताची कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:01 IST2021-02-20T05:01:51+5:302021-02-20T05:01:51+5:30

वीट येथील भाग्यश्री विकास गाडे ही विवाहित महिला बुधवारी सकाळी घरातील काम उरकून शेतात ज्वारी काढण्यासाठी गेली होती. ...

Brick murder case, thorough investigation of the suspect | वीट खून प्रकरण, संशयिताची कसून चौकशी

वीट खून प्रकरण, संशयिताची कसून चौकशी

वीट येथील भाग्यश्री विकास गाडे ही विवाहित महिला बुधवारी सकाळी घरातील काम उरकून शेतात ज्वारी काढण्यासाठी गेली होती. दुपारच्या सुमारास ती शेतात न दिसल्याने तिचा शोध घेतल्यानंतर शेतातील जवळच्या ओढ्यात दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे आढळून आले. तिचा पती, दोन मुले, सासरा असा परिवार आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस प्रमुख विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व बुधवारी रात्री घटनास्थळी डॉग स्कॉड ही मागवून शोध घेतला. आज दिवसभर वीट गावात पोलिसांनी तळ ठोकून यासंदर्भात सर्व प्रकारचे धागेदोरे शोधण्याचे काम केले.

फोटो

१८भागश्री गाडे

Web Title: Brick murder case, thorough investigation of the suspect