Breaking; रोपळे येथे ट्रॅक्टर - ट्रकचा अपघात;  ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 11:42 AM2020-11-01T11:42:46+5:302020-11-01T11:43:08+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Tractor-truck accident at Rople; The truck driver died on the spot | Breaking; रोपळे येथे ट्रॅक्टर - ट्रकचा अपघात;  ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

Breaking; रोपळे येथे ट्रॅक्टर - ट्रकचा अपघात;  ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

Next

पंढरपूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथे ट्रक व ऊस वाहतुक ट्रॅक्टरचा समोरासमोर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचे नाव बंडु दौलतराव घाडगे (रा.अंबाजोगाई, जि बीड) असे आहे.

दरम्यान, एमएच १३ डीई ४९२४ हा ऊसाचा ट्रॅक्टर पंढरपूर कडुन धाराशीवकडे जात होता. त्याचवेळी एम एच २७ बी एक्स १०८३ हा ट्रक बीड कडून पंढरपूर कडे येत होता. हे दोन्ही वाहन रोपळे येथे आले असता त्या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक चालक बंडु दौलतराव घाडगे (रा.अंबाजोगाई, जि बीड) यांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच ट्रकमधील आणखी एक व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर लाईफ लाईन रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

Web Title: Breaking; Tractor-truck accident at Rople; The truck driver died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.