शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Breaking; सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ५ जुलैपासून ऑनलाइन सुरू होणार

By appasaheb.patil | Updated: July 2, 2021 17:39 IST

हेल्पलाईन नंबर जाहीर; कुलगुरू डॉ. फडणवीस यांची माहिती

सोलापूर, - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 5 जुलै ते 21 ऑगस्ट 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होत असून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. pahsu.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

कोरोना आणि टाळेबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यापीठ परीक्षा विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून 5 जुलैपासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विविध अभ्यासक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या sudigitaluniversity.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तीन मिनिटांची एक व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे. ती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याचबरोबर हेल्पलाईन क्रमांक देखील जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, अशा सोप्या पद्धतीने ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी सोय विद्यापीठ परीक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप, संगणकावरून ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली. 

विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड कॉलेजच्या मेलवर पाठवलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पासवर्ड मिळाला नसेल तर त्यांनी फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून आपल्या मोबाईलवर पासवर्ड मिळवावे, अशी व्यवस्था पोर्टलवर करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेनुसार पोर्टलवर जाउन लॉगइन करावे. इतरवेळी त्यांनी पोर्टलवर जाऊन लॉगिन करू नये, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाईन क्रमांकअमित- 8010093831, शुभम- 8010076657, अफजल- 8010083760, विनायक- 8010085759.

परीक्षेसंदर्भात हेल्पलाइन क्रमांकमोटे- 8421905623, लटके- 8421238466, राजगुरू- 8421638556, धावारे- 8421068436, स्वामी- 8421528436, गायकवाड- 8421478451, आवटे- 8421401886, गायकवाड- 8421258436, मल्लाबादे- 8421488436.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरEducationशिक्षणexamपरीक्षाonlineऑनलाइन