शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; आपलं गाव... आपली सुरक्षा; सोलापूर ग्रामीण पोलिसांची नवी संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 14:59 IST

गाव सतर्क राहण्यासाठी प्रत्येक मंदिरावर सायरन बसविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मंगळवेढा/मल्लिकार्जन देशमुखे

गावची सुरक्षा ग्रामसुरक्षा दलाच्या हाती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील नागरिक सतर्क राहण्यासाठी प्राधान्याने प्रत्येक गावातील मंदिरावर सायरन व एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. याबाबत  पोलीस अधिकारी  स्वत: प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. स्थापना करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना मार्गदर्शन करून ती सक्रिय राहतील यासाठी उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे आपले गाव आपली सुरक्षा या पोलीस विभागाच्या संकल्पनेस सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.    मंगळवेढा पोलीस ठाण्यात भेट दिली असता त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.  लोकसंख्येच्या मानाने पोलीस विभागाकडे अपुरे कर्मचारी असल्याने लोकांच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यास मर्यादा येतात. तंटामुक्त जिल्हा ही चळवळ महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून राबविण्यात आली. त्या संकल्पनेचे १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण झाले. गावातील ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना पोलिसांचा माणूस म्हणून ओळख मिळाली पाहिजे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसून गुन्ह्याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल. आपले गाव सुरक्षित राहील, असे सांगितले.

प्रत्येक मंदिरावर सायरन बसविल्यास संपूर्ण गाव अलर्ट राहिल तसेच चोऱ्या रोखण्यास मदत होईल. या संकल्पनेबाबत झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्यावतीने ग्रामपंचायतीना सूचित केले जाईल.आमचे पोलीस अधिकारी प्रत्येक गावात भेट देऊन याबाबत तातडीने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी हे महत्वाचे सणाचे दिवस असून याकाळात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. वाढत्या दुचाकी चोरी ही गंभीर समस्या असून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून टोळी जेरबंद करण्याची सूचना याप्रसंगी पोलिस अधीक्षक सातपुते यांनी केल्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस