Breaking; कुमठे गावात धारदार शस्त्राने महिलेचा खून; एका संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 05:15 PM2020-11-08T17:15:14+5:302020-11-08T17:38:43+5:30

विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Breaking; Murder of a woman in a sharp session in Kumthe village; One suspect was taken into police custody | Breaking; कुमठे गावात धारदार शस्त्राने महिलेचा खून; एका संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात

Breaking; कुमठे गावात धारदार शस्त्राने महिलेचा खून; एका संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात

googlenewsNext

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे गाव परिसरात एका महिलेचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लक्ष्मीबाई शिवाजी माने (वय 40 रा. कुमठे गाव  सोलापुर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मीबाई माने ही कुमठे गावातील मध्यवर्ती येथील एका घरामध्ये राहत होती. पती नसल्याने ती एका रिक्षावाल्यासोबत संसार करत होती. शनिवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. सकाळी ती घरामध्ये मृतावस्थेत पडली होती. हा प्रकार शेजारच्या लोकांना लक्षात आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व त्यांचे पोलीस पथक घटनास्थळी गेले. पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्तांगावरही केला वार...

खुनाची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी गेले तेव्हा प्रथम दर्शनी त्यांना गळा दाबून व डोक्यात काहीतरी वस्तू मारून खून केल्याचे निदर्शनास आले होते. महिलेचे प्रेत उचलताना गुप्तांगावर ही वार केल्याचे दिसून आले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Breaking; Murder of a woman in a sharp session in Kumthe village; One suspect was taken into police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.