शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Breaking; पुनर्वसन विभागातील बोगस खातेदारांची जमीन होणार सरकार जमा; मंगळवारी मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2021 9:28 PM

सोलापूरसह पाच जिल्ह्यात खळबळ

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

कोयना प्रकल्पातील ६ हजार १५८ बोगस खातेदारांना सोलापूर ,सातारा रायगड येथे जमीन वाटप झाल्याचे उघड झाल्याचे स्पष्ट झाले  होते. याबाबत लोकमतने ऑनलाइन वृत्तही प्रसिद्ध केले होते, याची गंभीरपणे दखल  घेत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ९  नोव्हेंबरला मंत्रालयात बैठक लावली असून अतिरिक्त व डबल वाटप झालेली जमीन सरकार जमा हाेणार आहे . या निर्णयामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

कोयना धरणातील बाधित प्रकल्पग्रस्तांची संकलन यादी तब्बल साडे सहा दशकानंतर शासनाने तयार केली आहे. या महाशिल्पासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर या तीन तालुक्यातील ९८ गावातील १८७ गावठाणातील ९,८०० खातेदार शासन दरबारी नोंदले गेले होते. तर अनेक पात्र खातेदार पात्र असूनही अपात्र राहिले आहेत. कोयना धरणासाठी त्याग करणारे धरणग्रस्त अद्याप वंचितच आहेत. श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून सात वर्षापासुन कोयना पूत्राचा न्याय हक्काचा लढा सुरूच आहे. ३० ऑक्टोबर पर्यंत प्रकल्पग्रस्तांची संकलन यादी जाहीर करण्यात यावी असे आदेश शासनाने निर्गमित केले होते.

मुदत संपल्याबरोबर सातारा जिल्हा प्रशासनाने कोयना प्रकल्पग्रस्त खातेदारांना जादा वाटप केलेली जमीन काढून घेण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून चालू केली आहे. ज्या खातेदारांना दुबार व अतिरिक्त जमिनीचे वाटप झाले आहे. त्या खातेदारांना सातारा जिल्हाधिकारी यांच्या वतीने डबल व अतिरिक्त वाटप झालेली जमीन परत करावी अन्यथा त्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे नोटीस दिल्यामुळे सोलापूर सह पाच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातही मोठया प्रमाणावर बोगस खातेदाराच्या नावे जमीन वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.

या गंभीर प्रकरणांची दखल घेत मंत्रालयात ९ नोव्हेंबर रोजी  मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही  तातडीची बैठक आयोजित केली आहे. डबल व अतिरिक्त वाटप झालेली जमीन सरकार जमा करण्यात येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार