Breaking; पंढरपूर तालुक्यातील दूध डेअरी चालकास सव्वा दोन लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:51 IST2020-10-07T14:49:02+5:302020-10-07T14:51:44+5:30
Solapur milk news पंढरपुरातील तालुक्यातील शेटफळ येथील प्रकरण; लॅक्टोज पावडरची केली होती भेसळ

Breaking; पंढरपूर तालुक्यातील दूध डेअरी चालकास सव्वा दोन लाखाचा दंड
सोलापूर : फॅट वाढविण्यासाठी दूधात लॅक्टोज व व्हे परमिट पावडर आणि गोडेतेलाचा वापर केल्याप्रकरणी दूध डेअरी चालक शहाजी साबळे (रा. साबळे वस्ती, शेटफळ, ता. पंढरपूर) यास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी २ लाख २५ हजार रूपयाचा दंड ठोठावला.
अन्न व औषध प्रशासनाने २३ डिसेंबर २०१९ रोजी शेटफळ येथील शाम दुध केंद्रावर छापा टाकला होता, केंद्र चालकाने दुधात भेसळ करण्यासाठी व्हे परमिट पावडर ९८ किलो, लॅक्टोज पावडर ९८ किलो आणि १५ किलो गोडेतेलाचा डबा साठा करून ठेवल्याचे आढळले. याप्रकरणी त्यांच्याविरूध्द तीन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या़ या कारवाईची सुनावनी अन्न व औषध प्रशासनासमोर झाली़ तिन्ही प्रकरणात डेअरी चालक साबळे यास दोषी धरून प्रत्येकी ७५ हजार रूपयाचा दंड केला. आता भेसळीचे पुढील प्रकरण न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.