सोलापूरची पोरं हुशार; सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के...!

By Appasaheb.patil | Published: July 16, 2020 01:21 PM2020-07-16T13:21:41+5:302020-07-16T13:21:55+5:30

यंदाही मुलींची बाजी; ५० हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण

The boys of Solapur are smart; Twelfth result of Solapur district is 93.74 | सोलापूरची पोरं हुशार; सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के...!

सोलापूरची पोरं हुशार; सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के...!

googlenewsNext

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात आला.  यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के इतका लागला आहे.

बारावीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके व शहरातून कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून ५३  हजार ७४० विद्यार्थी परीक्षेस बसले होते़  त्यापैकी ५० हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  यात अ श्रेणीतून २३ हजार ९०४, ब श्रेणीतून १९ हजार ४०४ विद्यार्थ्यानी यश मिळविले आहे.

तालुकानिहाय निकाल

  • अक्कलकोट : 90.70%
  • बार्शी : 93.81%
  • करमाळा : 89.62%
  • माढा : 95.09%
  • माळशिरस : 92.40%
  • मंगळवेढा : 97.30%
  • मोहोळ : 95.62%
  • पंढरपूर : 95.36%
  • उत्तर सोलापूर : 92.92%
  • सांगोला : 95.70%
     

Web Title: The boys of Solapur are smart; Twelfth result of Solapur district is 93.74

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.