नवस फेडण्यासाठी मुलगा वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 04:56 IST2018-10-25T04:56:19+5:302018-10-25T04:56:22+5:30

मूल होण्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी आई-वडिलांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला तब्बल आठ किमी विवस्त्र चालवत नेल्याचा धक्कादायक आणि अघोरी प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे.

 The boy went to pay the vow | नवस फेडण्यासाठी मुलगा वेठीला

नवस फेडण्यासाठी मुलगा वेठीला

सोलापूर- मूल होण्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी आई-वडिलांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला तब्बल आठ किमी विवस्त्र चालवत नेल्याचा धक्कादायक आणि अघोरी प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. संगमेश्वर नगर येथील ट्रकचालक असलेल्या नागेश रणधिरे व त्यांची पत्नी शीतल यांनी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या हिप्परगानजीकच्या मश्रुम गणपतीला हा नवस केला होता. तो फेडण्यासाठी बुधवारी सकाळी त्यांनी संगमेश्वर येथून मुख्य रस्त्याने मुलाला चालवत नेले. यात अंधश्रद्धा नसून आमची गणपतीवर श्रद्धा आहे, असेही दाम्पत्याने म्हटले.

Web Title:  The boy went to pay the vow