शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बागा बोगस... विमाही बनावट...; 24 जिल्ह्यात 3404 प्रकरणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 17:52 IST

सर्वाधिक विमा भरलेल्या जालना व जळगाव जिल्ह्यात तपासणीला मोठे अडथळे निर्माण केले जात असल्याचे सांगण्यात आले. 

अरुण बारसकर -सोलापूर : बनावट विमामाफियांच्या दबावामुळे तपासणीत येणारे अडथळे पार करीत कृषी खाते धाडसाने फळपीकांची तपासणी करीत आहे. राज्यात आतापर्यंत फळबागा नसताना विमा भरलेली ३४०४ बनावट प्रकरणे आढळून आली आहेत. सर्वाधिक विमा भरलेल्या जालना व जळगाव जिल्ह्यात तपासणीला मोठे अडथळे निर्माण केले जात असल्याचे सांगण्यात आले. 

अंबिया बहार फळपीकांचा  बनावट शेतकऱ्यांकडून भाडेकरार जमीन दाखवून तसेच फळपीक नसताना विमा उतरल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते. याची वृत्तमालिका लोकमतने प्रसिद्ध केली होती. कृषी खात्याकडून याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारला पञ दिले होते. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी या प्रकरणाची संपूर्ण तपासणीचे आदेश दिले असतानाच केंद्रीय कृषी सचिवांनीही राज्याला तपासणीचे पञ दिले होते. राज्यभरात सुरु असलेल्या तपासणीत आतापर्यंत ३४०४ बनावट प्रकरणे उघडकीस आली आहेत. बनावट पीक विम्याचे लोण राज्यातील २४ जिल्हात असल्याचे आतापर्यंत आढळले असून तपासणी अद्याप सुरूच असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी राज्यात २ लाख ४८ हजार ९२३ शेतकऱ्यांकडून फळपीक विमा भरला आहे. यामध्ये जमिनीच्या मूळ मालकांऐवजी इतरांनीच भाडे तत्त्वावर जमिनी दाखवुन फळबागा नसताना पीक विमा भरणा केला आहे. संपूर्ण फळबागांची कृषी सहाय्यक, तलाठी व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. माञ बनावट रॅकेटच्या दबावामुळे अनेक जिल्हात तपासणीला अडथळे आणले जात आहेत. प्रामुख्याने जालना व  जळगाव जिल्हात तपासणीला अडथळे आणले जात आहेत. आतापर्यंत राज्यात अवघ्या ५२ हजार हेक्टरची तपासणी झाली आहे. 

विमा कंपनीचेही लोक सहभागी?२०२१-२२ या वर्षीची असे प्रकार झाले माञ सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर पैसे मिळालेत. या वर्षी फळपीक विमा क्षेञ दीडपट झाले आहे. विमा कंपनीच्या काही लोकांना याची कल्पना होती माञ त्यांनी गप्प राहण्याचे काम केले. त्याला कृषी खात्याकडूनही बळ मिळाल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी