शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरातच दवाखाना चालवणाऱ्या बोगस डॉक्टरचे बिंग फुटले; असा झाला गुन्ह्याचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:45 IST

एक व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये खासगी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या नागरिकांच्या लेखी तक्रारी तहसीलदार व सांगोला पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या.

सांगोला : वैद्यकीय पात्रता नसताना विनापरवाना, बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल, याची जाणीव असताना रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारीवरून बोगस डॉक्टर विरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा नोंदला आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अविनाश उत्तम खांडेकर (रा. लोटेवाडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी डॉ. प्रवीण वीरूपक्षाप्पा बडगिरे (रा. लक्ष्मीनगर, दंडाची वाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९५६ चे कलम १५ व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर १९६१ चे कलम-३३ (२) व भारतीय न्याय संहिता कलम - ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

लक्ष्मीनगर येथील डॉ. प्रवीण बडगिरे हा मागील ४ ते ५ वर्षांपासून गावातील मारुती मंदिराजवळ स्वतःच्या घरामध्ये खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे नागरिकांच्या लेखी तक्रारी तहसीलदार व सांगोला पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तालुका आरोग्याधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी ११ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता लक्ष्मीनगर येथे भेट दिली असता सदर बोगस वैद्यकीय व्यवसायाचा प्रकार उघडकीस आला.

कागदपत्रांची पडताळणी तालुका आरोग्याधिकारी डॉ. खांडेकर यांनी डॉ. प्रवीण बडगिरे यांच्याकडील असणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाच्या कागदपत्रांची तपासणी, पडताळणी केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९५६ किंवा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट २००० प्रमाणे संबंधितांकडे नोंदणी करून त्यासोबत शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक होते; परंतु अशी कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉ. प्रवीण बडगिरे हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करून, रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल, याची जाणीव असताना फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी