जुनोनीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:10 IST2021-01-08T05:10:05+5:302021-01-08T05:10:05+5:30

हातीदचे पोलीसपाटील धनाजी खंडागळे यांना ५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जुनोनी येथील विनायक घाडगे यांच्या शेतात एक ...

The body of an unknown Isma was found in Junoni | जुनोनीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

जुनोनीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

हातीदचे पोलीसपाटील धनाजी खंडागळे यांना ५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जुनोनी येथील विनायक घाडगे यांच्या शेतात एक अनोळखी इसम पडल्याचे बाळासाहेब कोळेकर यांनी फोन केला. त्याआधारे धनाजी खंडागळे यांनी तेथे जाऊन पाहिले असता इसम निपचिप पडल्याचे पाहून संशय आला. यानंतर पोलीस नाईक विजय थिटे यांना फोन करून सदरचा प्रकार सांगितला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे, पोलीस नाईक विजय थिटे, पोलीस नाईक प्रमोद गवळी, पोलीस नाईक राजू चौगुले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन डाॅ. अमोल भगत यांना बोलावून घेतले. डाॅक्टरांनी ईसीजी काढून तपासणी केली असता इसम मयत असल्याचे सांगितले. याबाबत पोलीसपाटील धनाजी नामदेव खंडागळे यांनी पोलिसांत खबर दिली आहे.

Web Title: The body of an unknown Isma was found in Junoni