सिद्धेश्वर तलावात आढळला महिलेचा मृतदेह 

By रूपेश हेळवे | Updated: June 4, 2023 18:19 IST2023-06-04T18:19:00+5:302023-06-04T18:19:11+5:30

लक्ष्मी मधुसूदन कोंगारी ( वय ४३, रा. राघवेंद्र नगर, एमआयडीसी) असे मृत महिलेचे नाव आहे.

Body of woman found in Siddheshwar lake | सिद्धेश्वर तलावात आढळला महिलेचा मृतदेह 

सिद्धेश्वर तलावात आढळला महिलेचा मृतदेह 

सोलापूर : सिद्धेश्वर मंदिराच्या तलावातील पाण्यात एक महिला पाण्यात तरंगताना आढळली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मी मधुसूदन कोंगारी ( वय ४३, रा. राघवेंद्र नगर, एमआयडीसी) असे मृत महिलेचे नाव आहे.

रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मृत लक्ष्मी कोंगारी या मंदिर तलावातील पाण्यात बेशुद्ध अवस्थेत तरंगताना आढळल्या. ही माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याचा पुढील तपास फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे कटारे हे करत आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

Web Title: Body of woman found in Siddheshwar lake