रक्ताळलेल्या पाठीला अजूनही खंजिराची भीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST2021-06-22T04:16:24+5:302021-06-22T04:16:24+5:30
‘आम्ही दोघी भांडतो, रुसतो, फुगतो; परंतु त्या मंडळींबरोबर नका ना आमची तुलना करू. आम्ही नक्कीच त्यांच्यापेक्षा अधिक समजूतदार आहोत’, ...

रक्ताळलेल्या पाठीला अजूनही खंजिराची भीती !
‘आम्ही दोघी भांडतो, रुसतो, फुगतो; परंतु त्या मंडळींबरोबर नका ना आमची तुलना करू. आम्ही नक्कीच त्यांच्यापेक्षा अधिक समजूतदार आहोत’, असं दोघींनीही एका तालात, एका सुरात सांगितलं. जणू जुळ्या ‘चिंकी-मिंकी’सारखं. दरबारात हशा पिकला. वातावरण हलकं-फुलकं बनलं.
‘पण काय मुनीऽऽ या तीन पार्ट्यांमध्ये नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे ? सातत्यानं का फील येतोय सार्वजनिक नळावरचा ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ महाराजांनी विचारताच नारद उत्तरले, ‘केवळ आपल्यालाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय महाऽऽराज. मी समक्ष जाऊनच शोध घेतो. आज्ञा असावी. ? ? ? ? ? ? ? ?’
वीणा झंकारत नारद भूतलावर पोहोचले. सुरुवातीला त्यांना ‘पटोले नाना’ भेटले. ते कुणाशीतरी मोबाईलवरून बोलत होते, ‘हे बघ, मला वर्षा बंगला सूट होईल की दुसरा याचा निर्णय उद्या घेतो. तोपर्यंत दोन-तीन लाल दिव्यांच्या नव्या कोऱ्या गाड्या आजच बुक करून ठेव. एक मुंबईत, तर दुसरी भंडाऱ्यात फिरण्यासाठी ? ते आपल्या राजू पीएसोबत ‘भावी सीएम’पदाची चर्चा करताहेत, हे मुनींच्या लक्षात आलं.
‘काय हो नानाभाऊऽऽ तुमची तयारी तर भलतीच जोरात दिसतेय. मग सध्याचे सीएम कुठं जाणार ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ नारदांनी खोदून विचारताच ‘नाना ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ नेहमीप्रमाणं जोरात बोलले, ते पीएम्ना विचारा. चला जाऊ द्या मला विदर्भाच्या दौऱ्यावर. ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’
नाना निघाले, पाठमोरे झाले. त्यांची पाठ जरा मोठी वाटली. नारदांनी विचारताच एका कार्यकर्त्यानं हळूच सांगितलं, ‘आजकाल नाना शर्टाच्या आत चिलखत घालून फिरताहेत. आश्चर्याने मुनी दादरमध्ये गेले. तिथं ‘रौतांचे संजयराव ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ भेटले. ‘तुमचे पॉलिटिकल पार्टनर नाना म्हणत होते की, सीएमबद्दल पीएमना विचार, हा काय प्रकार ? त्या दोघांचं काय दिल्लीत ठरलं-बिरलं की काय ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’
डोकं खाजवत ‘संजयराव’ हळूच कुजबुजले, ‘आजकाल उद्धोंच्या मनात काय चाललंय, हे आम्हालाही कळेनासे झालंय. माझेपण आडाखे चुकू लागलेत.’
नारद गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘कदाचित थोरले काका बारामतीकरांपर्यंत या हालचाली पोहोचू नये म्हणून तुमच्यापासूनही गुप्त ठेवल्या जात असाव्यात...पण काय हो...दिल्लीच्या भेटीत गिफ्ट दिले म्हणे नमोंनी खास’ यावर ‘रौतां’नी बोलायला टाळलं; मात्र ‘प्रतापराव’ घाईघाईनं बोलले, ‘होय...होय...तेच चिलखत घालून आमचे नेते फिरताहेत सर्वत्र. माझ्या लेटरमध्येही लिहिलंय की तसं !
पुन्हा पाठीवरच्या चिलखताचा विषय कानावर पडताच मुनी चमकले. त्यांनी थेट ‘बारामती’ची वाट धरली. ‘गोविंद बागे’जवळ ‘प्रशांत किशोर’चा कार ड्रायव्हर भेटला, ‘अभी इसके आगे हमारे साब का हेड ऑफिस इसी गाँव मे होगाऽऽ’ त्याचं पुटपुटणं कानावर पडलं. बंगल्यात मिटिंग सुरू होती. एका स्टील कंपनीचे अधिकारी ‘पीपीटी’ सादर करत होते. खासगी साखर कारखान्यांच्या साखळी निर्मितीनंतर ‘अजितदादां’नी आता स्टील फॅक्टरीतही लक्ष घातलं की काय ? असं उगाच मुनींना वाटून गेलं. तो ऑफिसर शेवटी बोलला, ‘कितीही होऊ देत आमचं भक्कम चिलखत हण्ड्रेड परसेंट सेफ राहतं...!
स्पीच संपलं. साऱ्यांच्या नजरा ‘थोरल्या काकां’कडं वळल्या. त्यांनी मूकपणेच संमती दिली. डील झालं. डझनभर चिलखतांची ऑर्डर दिली गेली. ‘काका’ निघाले. ‘दादा’ही त्यांच्या ‘पाठी’मागं निघाले. मात्र झाकत त्यांचा हात धरून ‘काकां’नी आपल्यासोबत घेतलं. मुनी गोंधळले. तेव्हा मिश्कील हसत ‘काका’ हळूच बोलले, ‘मला खंजिरांची भीती नाही वाटत, विरोधकांचीही नाही वाटत. फक्त आपल्याच माणसांपासून मी नेहमी सावध असतो. पहाटे झोपेतही !’
अगाऽऽगाऽऽ मुनींच्या डोक्यात प्रकाश पडला. ते तत्काळ इंद्र दरबारात पोहोचले, ‘महाऽऽराज भूतलावर राज्य केवळ चिलखतांचंच, दहशत केवळ खंजिरांचीच. प्रत्येकालाच वाटतंय की आपल्या पाठीत खंजीर खुपसला जाणार.