शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्याविरोधात ‘सिटू’चा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST

सोलापूर : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘सिटू’च्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज गेंट्याल चौकात रास्ता रोको ...

सोलापूर : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘सिटू’च्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज गेंट्याल चौकात रास्ता रोको केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘मोदी सरकार की तानाशाही नही चलेगी.. नही चलेगी’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा आला; पण संतप्त कार्यकर्त्यांच्या रास्ता रोकोमुळेे बोरामणी नाका ते गुरुनानक चौक दरम्यान वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. माजी आमदार नरसय्या आडम आणि ‘सिटू’चे राज्य महासचिव ॲड. एम. एच. शेख यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दिल्लीतील आंदोलनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास ‘सिटू’कडून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आडम यांनी दिला.

यामध्ये अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, एस.एफ.आय. तसेच ‘सिटू’ प्रणीत अन्य संघटित-असंघटित कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. यावेळी नगरसेविका कामिनीताई आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसूफ शेख, हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम आदी उपस्थित होते.

............

आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल

रास्ता रोको प्रकरणी सिटूच्या आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह आठ ते दहा जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.