शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यावर भाजप प्रांतिक कार्यकारिणीचे लक्ष; बापूंवर माढा तर पालकमंत्र्यांवर सोलापूरची जबाबदारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:07 IST

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघ सहकारमंत्री सुभाष देशमुख तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर देण्यात आली ...

ठळक मुद्देभाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांनी घेतली पदाधिकाºयांची बैठकपदाधिकाºयांना विधानसभानिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आलेप्रदेश कार्यकारिणीचे लोक कामांचा आढावा घेणार

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघ सहकारमंत्री सुभाष देशमुख तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र दोन्ही मंत्र्यांनी दोनही मतदारसंघातील कामांवर लक्ष ठेवावे. विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारीचे वाटप व्हावे, असा निर्णय भाजपा पदाधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आला. 

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य रघुनाथ कुलकर्णी आणि विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत सरस्वती चौकातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, भाजपाचे शहर सरचिटणीस विक्रम देशमुख, हेमंत पिंगळे, दत्तात्रय गणपा, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. 

सोलापूर आणि माढ्यातील भाजपाचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. पण पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करण्याच्या दृष्टीने कामाला लागा, असे कुलकर्णी यांनी सांगितले. या बैठकीत पदाधिकाºयांना विधानसभानिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले. दोन देशमुखांनी दोनही मतदारसंघातील परिस्थितीवर लक्ष ठेवावे. हे दोनही मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपाकडे आलेच पाहिजेत, असेही सांगण्यात आले. प्रदेश कार्यकारिणीचे लोक कामांचा आढावा घेणार आहेत. 

पंढरपूर-मंगळवेढ्याची जबाबदारी परिचारकांकडेच्या बैठकीत पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे देण्यात आली. - शहर उत्तरची जबाबदारी विक्रम देशमुख, मध्य - हेमंत पिंगळे, पांडुरंग दिड्डी, दक्षिण - रामप्पा चिवडशेट्टी, दत्तात्रय गणपा,        अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी,  मोहोळ-उत्तर सोलापूर - संजय क्षीरसागर, काळे, काशिनाथ कदम यांच्यावर देण्यात आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख