शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सत्तेसाठी काहीही करेल - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:11 IST

मनमोहनसिंगच करू शकतात मोदींचा मुकाबला !

ठळक मुद्दे२०१९ च्या निवडणुका हा भाजपासाठी संविधान बदलण्याचा शेवटचा मोका - प्रकाश आंबेडकर समविचारी पक्षाने देश पातळीवर एकत्र येण्याची गरज - प्रकाश आंबेडकर

पंढरपूर :  भारतात दोन समाजात तेढ निर्माण करुन दंगली घडवल्या जातील, युद्ध लादून सैनिकांना शहीद करण्याचे काम देखील होईल. यातून आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र भाजपा निर्माण करेल. कारण भाजपा सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

धनगर आरक्षणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या धनगर मेळाव्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला फक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेच करु शकतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आणखी राजकीय शिक्षणाची गरज आहे. काँगे्रसला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर लहान पक्षांना एकत्र घ्यावे लागेल; मात्र त्यांनी कर्नाटकाच्या निवडणुकात बोध घेतल्याचे दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष बदलत नसेल तर, तिसरा पर्याय निर्माण होईल. कर्नाटक येथील काँग्रेस व जेडीएस यांचे सरकार स्थिर नाही.

पुढील तीन महिन्यामध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. घटनेत तरतूद असलेल्या इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नसून त्यांना आरक्षण मिळावे. यासाठी आम्ही प्रयत्न करु असे आंबेडकर म्हणाले. यापुढे अल्लुतेदार व बल्लुतेदारांना बरोबर घेऊन सत्ता संपादन करणार आहे व सत्तांतरानंतर बारा बलुतेरांचे प्रश्न सोडवित असताना, बहुजन समाजाला सोबत घेणार असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

संविधान बदलण्याचा शेवटचा मोकाभाजपाला संविधान बदलायचे आहे. त्यामुळे ते सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असल्याचे कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर दिसले आहे. २०१९ च्या निवडणुका हा भाजपासाठी संविधान बदलण्याचा शेवटचा मोका आहे. यामुळे २०१९ पूर्वी अनेक प्रकार दिसून येतील असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले; मात्र त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ न देण्यासाठी समविचारी पक्षाने देश पातळीवर एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाManmohan Singhमनमोहन सिंगKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८