शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

माढ्यात भाजपच्या उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 10:29 IST

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आजपर्यंत वेगवेगळ्या नावावर चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देसातारा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नावावर निश्चिती होण्याची चिन्हेमाढ्याची जागा भाजपाने अत्यंत महत्त्वाची केली आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजप अतिशय सावध पावले उचलत आहे

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास येत्या दोन दिवसात प्रारंभ होईल, मात्र अद्यापही भाजपचा उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब होताना दिसत नाही.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आजपर्यंत वेगवेगळ्या नावावर चर्चा सुरू आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील हे उमेदवार असणार नाहीत, हे निश्चित झाल्यानंतर कोणाचे नाव समोर येणार याबाबत उत्सुकता आहे. सातारा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नावावर निश्चिती होण्याची चिन्हे आहेत. त्यांचे नाव भाजपच्या कोअर कमिटीकडे गेले आहे, मात्र भाजपने आपली यादी जाहीर केली नसल्याने हे नाव अद्यापही गुलदस्त्यात राहिले आहे.

माढ्याची जागा भाजपाने अत्यंत महत्त्वाची केली आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजप अतिशय सावध पावले उचलत आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्री या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील नेत्याशी संपर्क साधून भाजपाला बळकट करण्याची संधी दवडत नाहीत. दोनच दिवसांपूर्वी राजेंद्र राऊत आणि प्रशांत परिचारक यांना मुंबईत बोलावून त्यांनी पवारप्रेमापेक्षा पक्षाकडे अधिक लक्ष द्या, असे सांगितले. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मंगळवारी संजयमामा शिंदे यांनी गद्दारी केली असून, त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे माढ्याची जागा कोणत्याही स्थितीत राखायची, या उद्देशाने भाजपने आपली व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून अद्यापही या मतदारसंघात उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही. मात्र येत्या एक ते दोन दिवसात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संजय शिंदे यांची टीकाभाजपचा उमेदवार जाहीर होत नसल्याने आपल्या प्रचारात संजय शिंदे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. भाजपचा घोळ उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत सुरूच राहणार असल्याचे ते सांगत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRanjitsingh Nimbalkarरणजितसिंह निंबाळकरSatara areaसातारा परिसर