सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लू दाखल; जंगलगीच्या एक किलोमीटरमधील कोंबड्या करणार नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 19:09 IST2021-01-16T19:08:07+5:302021-01-16T19:09:43+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लू दाखल; जंगलगीच्या एक किलोमीटरमधील कोंबड्या करणार नष्ट
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील जंगलगीमध्ये कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. जंगलगी परिसरातून इतर परिसरात बर्ड फ्लूची लागण होऊ नये यासाठी जंगलगीपासून एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने या कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.