धडक दिली; उलट मचमच करुन बाईकस्वारानं केला दगडांचा मारा
By विलास जळकोटकर | Updated: March 25, 2023 14:55 IST2023-03-25T14:54:33+5:302023-03-25T14:55:26+5:30
कुंभारीच्या जत्रेतला प्रकार: दोघे तरुण जखमी.

धडक दिली; उलट मचमच करुन बाईकस्वारानं केला दगडांचा मारा
विलास जळकोटकर, सोलापूर: गावच्या जत्रेत बाईकवर थांबलेल्या दोघांना पाठिमागून आलेल्या बाईकस्वारानं धडक दिली. यात दोघे जखमी झाले. उलट त्यांच्याशीच बाचाबाची करुन दगडांचा मारा करीत जखमी केले. कुंभारी (ता द. सोलापूर) येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना मध्यरात्री १ च्या नंतर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेनसिद्ध शेटप्पा बन्ने (वय- २४), विठ्ठल गेनप्पा जडगे (वय- २३, दोघे रा. कुंभारी, ता. द. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. यातील वरील दोघे जखमी गावाती जत्रेत बाईकवर थांबले होते. दोघे एकमेकांशी गप्पा मारत असताना रात्री साधारण १० च्या सुमारास शिवानंद मुचंडे आि संकेत कुदळे हे दोघे दुचाकीवरुन आले त्यांची समोर उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. यावरुन जाब विचारताना दोघांनी दगडाने मारहाण केली. यात एकास हातापायाला आणि दुसऱ्याला डोक्यास दुखापत झाली. गावात प्रथमोचार करुन मध्यरात्री १ च्या सुमारास सोलापूर गाठले. येथे शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"