मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; घराबाहेर न पडण्याचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 09:44 AM2020-10-14T09:44:42+5:302020-10-14T09:45:11+5:30

विनाकारण घराबाहेर पडू नका; परतीचा पावसाचे सोलापुरात जोरदार आगमन

Big news; Warning of heavy rains in Solapur district; Appeal not to leave the house | मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; घराबाहेर न पडण्याचे आवाहन 

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; घराबाहेर न पडण्याचे आवाहन 

googlenewsNext

सोलापूर : हवामान विभागाने शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत (दि. १७) अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्रभर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला व पावसाची रिपरिप अजून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी  अजित देशमुख यांनी दिले आहेत. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके; तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट’ अॅप डाउनलोड करा ‘वीज पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची आगाऊ माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट’ हे अॅाप डाउनलोड करावे; तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 0217-2731012 किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन  अजित देशमुख  यांनी केले आहे.

Web Title: Big news; Warning of heavy rains in Solapur district; Appeal not to leave the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.