शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

मोठी बातमी; गुरुवारपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 21:12 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 ते 23 मे 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होत असून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. pahsu.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

कोरोना आणि टाळेबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यापीठ परीक्षा विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून 6 मे पासून बीए, बीकॉम, बीएस्सी भाग एक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तीन मिनिटांची एक व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे. ती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याचबरोबर हेल्पलाईन क्रमांक देखील जाहीर  करण्यात आले आहेत. 

विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, अशा सोप्या पद्धतीने ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी सोय विद्यापीठ परीक्षा विभागाकडून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप, संगणकावरून ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली. 

विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड कॉलेजच्या मेलवर पाठवलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पासवर्ड मिळाला नसेल तर त्यांनी फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून आपल्या मोबाईलवर पासवर्ड मिळवावे, अशी व्यवस्था पोर्टलवर करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळेनुसार पोर्टलवर जाउन लॉगइन करावे. इतरवेळी त्यांनी पोर्टलवर जाऊन लॉगिन करू नये, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाईन क्रमांक

अमित- 8010093831, शुभम- 8010076657, अफजल- 8010083760, विनायक- 8010085759.

परीक्षेसंदर्भात हेल्पलाइन क्रमांक

मोटे- 8421905623, लटके- 8421238466, आवटे- 8421638556, गंगदे- 8421068436, गावडे- 8421528436, बाबरे- 8421478451.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरexamपरीक्षाonlineऑनलाइनEducationशिक्षण