मोठी बातमी; मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी ११ डिसेंबरला 'एमआयएम'चा मुंबईत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 14:34 IST2021-11-23T14:30:57+5:302021-11-23T14:34:38+5:30
एमआयएम पक्षाचा सोलापुरात मेळावा

मोठी बातमी; मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी ११ डिसेंबरला 'एमआयएम'चा मुंबईत मोर्चा
सोलापूर : कोर्टाच्या आदेशानुसार मुस्लिमांनाही आरक्षण मिळावे या मागणीसाठी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्यावतीने ११ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खा. इम्तियाज जलील यांनी सोलापुरात दिली.
सोलापुरात खा. असुउद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत आज एमआयएम पक्षाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी एमआयएम पक्षाचे राज्यातील इतर नेतेही उपस्थित होते. पुढे बोलताना खा. इम्तियाज जलील म्हणाले की, धनगर समाज, मराठ्यांना आरक्षण द्या पण कोर्टाच्या आदेशानुसार मुस्लिमांनाही आरक्षण मिळायला हवे. याशिवाय वक्फची जमीन हडपणार्यावर गुन्हे दाखल करा अशीही मागणी केली. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एमआयएमचे कार्यकर्ते गाड्यांना तिरंगा झेंडा लावून हजारो कार्यकर्ते मुंबईत मोर्चा काढणार असल्याचेही खा. जलील यांनी सांगितले.
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वपक्षातील नेत्यांनी झेंडा बाजूला ठेऊन समाजासाठी सहभागी व्हावे असेही आवाहन खा. जलील यांनी सोलापुरात केले.