मोठी बातमी; परराज्यात रेल्वेने प्रवास करण्यासाठी कोरोनाची टेस्ट करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 06:04 PM2021-02-28T18:04:24+5:302021-02-28T18:04:57+5:30

प्रशासन सतर्क : टेस्ट निगेटिव्ह आल्यास प्रवासाला परवानगी

Big news; It is mandatory to test the corona for traveling by train in a foreign country | मोठी बातमी; परराज्यात रेल्वेने प्रवास करण्यासाठी कोरोनाची टेस्ट करणे बंधनकारक

मोठी बातमी; परराज्यात रेल्वेने प्रवास करण्यासाठी कोरोनाची टेस्ट करणे बंधनकारक

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - वाढत्या कोरोना रूग्णांमुळे देशातील सर्वच राज्यांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार केरळ, दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. चाचणी निगेटिव्ह आल्यास प्रवासाला परवानगी देेण्यात येणार आहे.

कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने राज्याराज्यांतील प्रशासन सतर्क झाले आहे. प्रारंभी कर्नाटक राज्याने रस्त्यांने येणार्या प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश करताना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती, त्यानंतर हळूहळू इतर राज्यांनेही प्रवासांवर निर्बंध लादण्यास सुरूवात केली. आता रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार केरळ, दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थानात जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. ही चाचणी जर निगेटिव्ह असेल तर राज्यात प्रवेश मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. काही कारणाने प्रवाशांना कोरोनाची चाचणी न केल्यास संबंधित प्रवाशांची रेल्वे स्टेशन परिसरात कोरोना चाचणी करण्यात येईल त्यात ते निगेटिव्ह असल्याचे आढळून आल्यास त्यांना क्वारंटाइन करण्याचेही नियोजन त्या त्या राज्याने केले असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

पर्यटकांच्या संख्येत घट

सोलापूर विभागातून केरळ राज्यात जाणाऱ्या दोन गाड्या आहेत. त्यात कन्याकुमार ते मुंबई सीएसएमटी (नागरकोईल एक्सप्रेस) व कुर्ला एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश येतो. सोलापुरातून पर्यटनासाठी केरळात जाणार्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. दरम्यान, केरळ राज्याने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

सोलापूर स्थानकावर तपासणी

सध्या सोलापूर रेल्वे स्थानकावर थर्मल स्क्रीनिंगव्दारे स्टेशनवरच प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय मास्क न वापरणार्यां प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. तपासणीवेळी जर लक्षणे आढळून आल्यास प्रवाशांवर प्रवास न करण्याच्या सुचना देण्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.

दिल्ली, गुजरात, गोवा, राजस्थानातही निर्बंध

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे इतर राज्यातील प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, गुजरात, गोवा, राजस्थानामध्ये जाणार्या महाराष्ट्रातील प्रवाशांवर विविध निर्बंध घातली आहेत. कोरोना चाचणी बंधनकारक शिवाय लक्षणे आढळल्यास त्या त्या राज्यातील शासकीय रूग्णालयात क्वारंटाइन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Big news; It is mandatory to test the corona for traveling by train in a foreign country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.