मोठी बातमी; इलेक्ट्रो होमिओपॅथी पदवीला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता
By Appasaheb.patil | Updated: October 22, 2022 18:02 IST2022-10-22T18:02:34+5:302022-10-22T18:02:40+5:30
सोलापूर लोकमत न्यूज

मोठी बातमी; इलेक्ट्रो होमिओपॅथी पदवीला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता
सोलापूर : इलेक्ट्रो होमिओपॅथी पदवीला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता ॲमेस्थिस सोशल ॲन्ड हेल्थ इन्टिट्युशनलचे अध्यक्ष डॉ. एम.के. शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या निर्णयामुळे सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील शेकडो इलेक्ट्रो होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत डॉ. सुरेंद्र पांडे आणि पंजाबचे प्रोफेसर डॉ. हरविंदर जी. सिंह यांनी बैठकीत ईएचआयडीसीची सर्व रहस्ये प्रश्नांवर आपले मत मांडून डॉ. सुरेंद्र पांडे यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊन आयडीसीच्या प्रमुखांचे समाधान केले आहे. ईएचएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. परमिंदर एस. पांडे यांनीही ५ लाख इलेक्ट्रो पॅथी डॉक्टरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
इलेक्ट्रो होमिओपॅथीबद्दल प्रेझेंटेशन या पद्धतीने देण्यात आले. सेहॅकच्या वतीने उपसंचालक डॉ. प्रभातकुमार सिन्हा यांनी आयडीसीसमोर आपली बाजू मांडताना इलेक्ट्रो होमिओपॅथी हे भौतिकशास्त्रावर आधारित विज्ञान असल्याचे सांगितले आणि औषधांमध्ये असलेली जैवऊर्जा असल्याचेही सांगितले. या प्रस्तावाचे आयडीसीचे अध्यक्ष डॉ. कटोच यांनी कौतुक केले.