मोठी बातमी; सोलापूरचे डॉ. लालासाहेब तांबडे यांना वाराणसी येथे सर्वोत्कृष्ठ शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 12:18 PM2021-10-09T12:18:13+5:302021-10-09T12:18:42+5:30

महाराष्ट्र राज्यातून एकमेव डॉ. लालासाहेब तांबडे यांना हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे.

Big news; Dr. of Solapur. Awarded Best Scientist Award to Lalasaheb Tambade at Varanasi | मोठी बातमी; सोलापूरचे डॉ. लालासाहेब तांबडे यांना वाराणसी येथे सर्वोत्कृष्ठ शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान

मोठी बातमी; सोलापूरचे डॉ. लालासाहेब तांबडे यांना वाराणसी येथे सर्वोत्कृष्ठ शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान

Next

सोलापूर : कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब रावसाहेब तांबडे यांना सर्वोत्कृष्ठ शास्त्रज्ञ २०२१ हा पुरस्कार उत्तर प्रदेशचे सामाजिक न्याय मंत्री रविंद्र जैस्वाल व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे उपमहानिर्देशक, कृषि विस्तार डॉ. अशोककुमार सिंग यांचे शुभहस्ते बुधवार ६ ऑक्टोबर, २०२१ रोजी बनारस हिन्दु विद्यापीठ, वाराणसी येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास काशी हिन्दु विद्यापीठाचे सत्मानीय कुलगुरू डॉ. व्ही.के. शुक्ला, बादा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दमसिंह गैतम, कृषि विज्ञान संस्था, काशी हिन्दु विद्यापीठाचे संचालक डॉ. जे. एस. बोहरा, अधिष्ठता व प्राचार्य कृषि विज्ञान संस्था, बी. एच. पु. काशीचे डॉ. बी. जिरली व भारतीय कृषि संशोधन संस्था नवी दिल्लीच्या प्रधान वैज्ञानिक व संचिव आय.एस.ई.ई. डॉ. रश्मी सिंग इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व देशामधील कृषि विस्तार विभागामध्ये कार्यकरणारे आजी माजी उच्च मान्यवर उपस्थित होते.

डॉ. लालासाहेब तांबडे यांचा सत्कार प्रमाणपत्र, काशी हिन्दु विद्यापीठ व भारतीय कृषि संशोधन संस्था नवी दिल्ली यांची शॉल व स्मृती चिन्ह सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ. तांबडे यांनी कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर येथे मागील २५ वर्षापासून अविरतपणे नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविणे, समाजमाध्माचा प्रभाविषणे (विशेषतः युट्युच, क्यु. आर. कोड व इतर समाज माध्यमांचा वापर) वापर करून कृषि तंत्रज्ञान प्रसार करणे, नाविण्यपूर्ण कृषि विस्तार पध्दतींवर संशोधन व विस्तार कार्यामध्ये त्यांचा प्रभावी वापर करणे, देशपातळीवरील विविध चर्चासत्रामधुन संबोधन करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकामध्ये शोध निबंध लिहीने तसेच शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि ग्रमिण युवक व महिलांना कृषिपूरक स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी सहाय्य व प्रोत्साहीत करणे याबाबींसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे.

डॉ. लालासाहेब तांबडे यांना हा पुरस्कार इंडियन सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एजुकेशन, भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली, काशी हिन्दु विद्यापीठ, वाराणसी व बादा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ, बांधा, उत्तर प्रदेश यांचे संयुक्त विद्यमाने  ४-६ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत वाराणसी येथे आयोजित स्वयंपूर्ण भारतीय कृषि क्षेत्रातील बदलासाठी कृषि विस्तराचा महुआयामी व नाविन्यपुर्ण दृष्टीकोन या विषयावरील राष्ट्रीय परिषदेमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला.

या राष्ट्रीय परिषदेमध्ये २५ राज्यातील ६५ पेक्षा जास्त कृषि विद्यापीठे व भारतीय कृषि अनुसंधान संस्थेच्या संस्था तसेच पाच आंतरराष्ट्रीय संस्थामधील ४३० पेक्षा जास्त कृषि शास्त्रज्ञ, कृषि संशोधक, कृषि विस्तारक विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्यामधुन एकमेव डॉ. लालासाहेब तांबडे यांना हा मानाचा पुरस्कार मिळालेला आसुन त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या अभुतपूर्व यशाबद्दल डॉ. लालासाहेब तांबडे यांचे अभिनंदन शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी,  डॉ. ए.के. सिंग, उपमहानिर्देशक, (भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली), डॉ. व्ही. व्ही. सदामते (माजी सल्लागार, भारतीय नियोजन आयोग) तसेच विविध कृषि विद्यापीठांचे कुलगुरु, संचालक, कृषि विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी व शेतक-यांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले आहे.

Web Title: Big news; Dr. of Solapur. Awarded Best Scientist Award to Lalasaheb Tambade at Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app