मोठी बातमी; सोलापुरातील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधिताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 14:33 IST2021-04-23T14:25:05+5:302021-04-23T14:33:23+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

मोठी बातमी; सोलापुरातील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधिताचा मृत्यू
सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी सकाळी नारायणराव एकनाथ खडतरे वय (७७ ) या कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्याने त्या रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांनी या सेंटरमध्ये जाऊन प्रकरणाची माहिती घेतली. खडतरे वृद्ध असतानाही त्यांना दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सिंहगड कोविड सेंटरमधील आरोग्य व इतर व्यवस्थेबद्दल यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.