मोठी बातमी: सिमेंटच्या बल्करचा सोलापूरजवळ मोठा अपघात; शाळकरी मुलं चेंगरली...
By Appasaheb.patil | Updated: September 1, 2023 14:49 IST2023-09-01T14:49:15+5:302023-09-01T14:49:30+5:30
सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर शाळेसमोर पलटी झाला

मोठी बातमी: सिमेंटच्या बल्करचा सोलापूरजवळ मोठा अपघात; शाळकरी मुलं चेंगरली...
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे सिमेंटच्या बल्करचा अपघात झाला. बल्कर पलटी झाल्याने चार ते पाच मुलं अडकल्याची प्राथमिक माहितीसमोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर नेमका औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाला. काहीवेळापूर्वीच हा अपघात झाला असून त्या सिमेंट बल्करखाली चार-पाच चिमुकली चेंगरल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले ही घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था ग्रामस्थ व पोलीस करीत आहेत.