मोठी बातमी; संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगावचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 02:00 PM2021-06-11T14:00:08+5:302021-06-11T14:00:26+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Bhandishegaon's Prashant Nanavare is second in India in the statistics competition | मोठी बातमी; संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगावचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा

मोठी बातमी; संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगावचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा

googlenewsNext

पंढरपूर : भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात  आलेल्या अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगाव (ता.पंढरपूर ) मधील प्रशांत विजय ननवरेने भारतामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.2014नंतर प्रथमच महाराष्ट्रातील  विद्यार्थीने पारितोषिक मिळविल्याने सर्वत्र प्रशांतचे कौतुक होत आहे.
      प्रशांत ननवरे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा संख्याशास्र विभाग व प्रगत अध्ययन केंद्राचा विद्यार्थी आहे.ह्या स्पर्धेत देशातील सर्व विद्यापिठांच्या संख्याशास्र विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते.फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत  महाराष्ट्रातील केवळ प्रशांतलाच हे पारितोषिक मिळाले आहे. ह्या स्पर्धेसाठी पुणे विद्यापिठाच्या संख्याशास्र विभागाच्या शिक्षिका डाॕ.आकांक्षा काशीकर व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
     अत्यंत गारीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या प्रशांतचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडीशेगाव ,नवोद्यय विद्यालय पोखरापूर , फर्ग्युसन काॕलेज व पुणे विद्यापिठ येथे झाले आहे.

Web Title: Big news; Bhandishegaon's Prashant Nanavare is second in India in the statistics competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.