Big news; The attendants will come to the National Social Party; Mahadev Jankar's assassination | मोठी बातमी; परिचारक राष्ट्रीय समाज पक्षामध्ये येतील; महादेव जानकर यांचा गौप्यस्फोट

मोठी बातमी; परिचारक राष्ट्रीय समाज पक्षामध्ये येतील; महादेव जानकर यांचा गौप्यस्फोट

पंढरपूर : राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रशांत पारिचारक येऊ शकतात. प्रशांत तिकडे राहिल तर उमेश परिचारक तर माझ्या पक्षामध्ये येऊ शकतात. असे बोलून महादेव जानकर यांनी पंढरपुरात राजकीय भूकंप केला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, माऊली सगर, पोपट क्षीरसागर, परमेश्वर पूजारी, आबासाहेब मोटे उपस्थित होते.

आ. गोपीचंद पडळकर राज्यभर दौरे करत आहेत. त्यांना भाजपा ओबीसीचा चेहेरा म्हणून पुढे करतात का ? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर जानकर म्हणाले, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहेत. मला साइड ट्रॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या पक्षामध्ये सर्व समाजाचे नेते आहेत. माझ्या पक्षात प्रशांत पारिचारक येऊ शकतात. प्रशांत तिकडे राहील तर उमेश परिचारक तर माझ्या पक्षामध्ये येऊ शकतात. असे स्पष्टीकरण जानकर यांनी दिले.

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पंढरपूरची जनता भूमिपुत्रालाच साथ देईल. पंढरपूरची जनता सुज्ञ आहे. यामुळे बाहेरून कोणी आलं आणि कोणी गेलं याचा फरक पोटनिवडणुकीत पडणार नाही.

राष्ट्रीय समाज पक्षाची पंढरपूरमध्ये ताकत कमी आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी वाढवणार आहे. त्याचबरोबर मागील आठ दिवसांपासून पक्ष बांधणी राज्यभर दौरेही सुरू आहे.  लाईट बिल माफ करण्याबाबत आश्वासन दिले होते, परंतु महाविकास आघाडी सरकार घुमजाव करत आहे. लाईट बिल माफ झाले पाहिजे. या मागणीबाबत भाजप किती गंभीर आहे, काय माहित नाही. परंतु रासपची तीच मागणी आहे. तसेच मराठा आरक्षणाला कोणत्याच सरकारचा विरोध नाही. यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आक्रमक होण्याची गरज नसल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.

Web Title: Big news; The attendants will come to the National Social Party; Mahadev Jankar's assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.