शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; राज्यातील ५७ साखर कारखान्यांनी एफआरपीचे ७९९ कोटी थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:05 IST

११३ कारखाने एफआरपीत क्लेअर; आरआरसी केलेल्या ३२ पैकी ३ कारखान्यांनी दिली संपूर्ण रक्कम

सोलापूर : राज्यातील १३३ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपीप्रमाणे व त्यापेक्षा अधिक रक्कम दिली असली तरी ५७ कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ७९९ कोटी ३६ लाख रुपये थकविले आहेत. मागील वर्षीच्या गाळप हंगामासाठी तब्बल ३२ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.

मागील हंगाम राज्यातील १९० साखर कारखान्यांनी घेतला होता. त्यापैकी १३३ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ५७ साखर कारखान्यांनी मात्र, ७९९ कोटी ३६ लाख रुपये अद्यापही दिले नाहीत. साखर आयुक्तांनी एफआरपी थकविणाऱ्या ३२ साखर कारखान्यांची आरआरसी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

मागील वर्षीच्या गाळपाचे राज्यातील साखर कारखान्यांनी २३ हजार ७ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. एफआरपीपेक्षा ३५ कोटी ९५ लाख रुपये अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती...

  • सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी, जनहित शेतकरी, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेच्या वतीने गेल्या पाच महिन्यांत साखर आयुक्त, जिल्हाधिकारी व साखर सहसंचालकांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आली. तरीही ४५४ कोटी ५३ लाख रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत.
  • - साखर सहसंचालक कार्यालयाच्या मते २२५ कोटी ५२ लाख रुपये थकले असून पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे, लोकनेते, सिद्धेश्वर, सासवड माळी शुगर हे कारखाने शेतकऱ्यांसोबतच्या कराराप्रमाणे बैलपोळा व दिवाळी सणाला देणार आहेत. त्यामुळे देय रक्कम ४५४ कोटी ५३ लाख रुपये दिसत आहेत.
  • - २ हजार ५२९ कोटी ८४ लाख रुपये (एकूण एफआरपीच्या ९२.९६ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी