मोठी बातमी; पंढरपुरात ४६ मोटारसायकली जप्त; मालकांचा शोध घेण्याचे काम सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 07:44 PM2021-06-10T19:44:20+5:302021-06-10T19:44:43+5:30

पंढरपूर पोलीसांची मोठी कामगिरी; जिल्हा पोलीस अधिक्षक सातपुते यांनी दिली माहिती

Big news; 46 motorcycles seized in Pandharpur; The search for the owner begins | मोठी बातमी; पंढरपुरात ४६ मोटारसायकली जप्त; मालकांचा शोध घेण्याचे काम सुरु 

मोठी बातमी; पंढरपुरात ४६ मोटारसायकली जप्त; मालकांचा शोध घेण्याचे काम सुरु 

googlenewsNext

पंढरपूर : मोटारसायकल चोरांना जेरबंद करुन त्यांच्याकडून १४ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या एकूण ४६ मोटार सायकली केल्या जप्त करण्याची कामगिरी पंढरपूर पोलीसांनी केली आहे. जप्त करण्यात असलेल्या मोटार सायकलच्या मालकांचा शोध घेण्याचे काम असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते सांगितली.


पंढरपूर येथे पत्रकार परिषदे दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोनि. अरुण पवार, पोनि. किरण अवचर, पोनि. प्रशांत भस्मे, सपोनि एम एन जगदाळे व उप पोनि. प्रशांत भागवत उपस्थित होते.


पुढे सातपुते म्हणाल्या, पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात २१ मे रोजी भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. याबाबत तपास करताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंढरपूर शहरातील एका इसमाने हा गुन्हा केल्याचा संशय आला. त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवून सखोल चौकशी केली. यावेळी त्याने वेगवेगळ्या मित्रांसह गाड्या चोरल्या विक्री केल्याचे समोर आले. या प्रकरणी नामेदव बबन चुनाडे (रा. पंढरपूर), विश्वास ढगे, अतुल नागनाथ जाधव, शकिल बंदेनवाज शेख, अभिमान उर्फ आबा अर्जुन खिलारे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम, पोहेकॉ शरद कदम, बिपीनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, इरफान मुलाणी, पोना शोएब पठाण, इरपान शेख, महेश पवार, संजय गुटाळ, प्रसाद औटी, पोकॉ सुनिल बनसोडे, सुजित जाधव, समाधान माने, सुजित उबाळे विनोद पाटील, अन्वर आतार (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली आहे. पुढील तपास पोह. सुरज हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे, पोना. शोएब पठाण, महेश पवार हे करीत आहेत.

Web Title: Big news; 46 motorcycles seized in Pandharpur; The search for the owner begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.