मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास ऑनलाइन दर्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 01:13 PM2020-11-19T13:13:31+5:302020-11-19T13:13:58+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; 24 hours online darshan of mother Vitthal Rukmini from Pandharpur started | मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास ऑनलाइन दर्शन सुरू

मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास ऑनलाइन दर्शन सुरू

googlenewsNext

पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाचा पलंग काढून भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.


१६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकी यात्रा होत आहे. प्रत्येक वर्षी कार्तिकी यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. 

त्यानुसार  गुरुवारी सकाळी ११:५५ वाजता परंपरेनुसार विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून विठ्ठलाची काकडा आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद राहतील. मात्र नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता एवढेच राजोपचार सुरु राहतील.

        श्रींचा पलंग काढल्याने विविध संकेतस्थळावर www.vitthalrukminimandir.org, मोबाईल अँप - श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान व खाजगी वृत वाहिनीवर उपलब्ध असलेले विठ्ठलाचाचे दर्शन २४ तास सुरू राहील. मात्र राज्य शासनाने नुकत्याच १४ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार विठ्ठलाचे मुखदर्शन कार्तिकी यात्रा कालावधीत कोणत्या दिवशी व वेळी उपलब्ध राहील, यांची नव्याने सूचना मंदिर समिती कडून देण्यात येईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Web Title: Big news; 24 hours online darshan of mother Vitthal Rukmini from Pandharpur started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.