शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मोठी बातमी; वीज पडून १४ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 10:01 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला - चिंचोली (वाघमोडेवाडी) ता. सांगोला येथील मराठी शाळेच्या पाठीमागे शेळ्या-मेंढ्याच्या वाडग्यावर वीज पडून लहान मोठ्या ११ मेंढ्या, २ शेळ्यासह १ पाठ अशा १४ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार झाल्या. ही घटना शनिवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. चिंचोली ( वाघमोडे वस्ती) येथील मेंढपाळ शिवाजी विष्णू गडदे यांचा शेळ्यामेंढ्या पालन व्यवसाय आहे. त्यांनी शनिवारी दिवसभर शेळ्या-मेंढ्यांना चारून सायंकाळी ६ च्या सुमारास घरा शेजारील वाडग्यात कोंडल्या होत्या दरम्यान रात्री ९ च्या सुमारास अवकाळी पावसात अचानक त्यांच्या वाडग्यावर वीज कोसळल्याने ११ लहान मोठ्या मेंढ्या व २ शेळ्यांसह१ लहान पाठ अशा १४ शेळ्या-मेंढ्या जागीच मृत्यू पावल्या. या घटनेची माहिती पोलीस पाटील हरिदास बेहेरे पाटील यांनी तहसीलदार अभिजीत पाटील यांना दिली . तलाठी विकास माळी यांनी घटनास्थळी भेट देवून मृत शेंळ्या मेंढ्याचा पंचनामा केला.

या घटनेत मेंढपाळ शेतकरी शिवाजी गडदे यांचे सुमारे ३:५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांनी मृत शेळ्या- मेंढ्याचे शवविच्छेदन केले. यावेळी परिचर दयानंद केंगार उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाRainपाऊसAccidentअपघात