भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक; पहिल्या फेरीअखेर महाडिक गट साडेतीन हजार मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 14:13 IST2022-11-14T14:12:54+5:302022-11-14T14:13:03+5:30
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी सुरु आहे.

भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक; पहिल्या फेरीअखेर महाडिक गट साडेतीन हजार मतांनी आघाडीवर
सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी सुरु आहे. पहिल्या फेरीत मतदान बूथ क्रमांक १ ते २८ वरील मतांचे गठ्ठे एकत्र करुन मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीमध्ये सभासदांचा कल पुन्हा एकदा विद्यमान चेअरमन तथा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भीमा शेतकरी विकास आघाडीच्या बाजूने साधारण कल असून यामध्ये पहिल्या फेरीत अंदाजे ३५०० मतांचे लीड असल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकृत घोषणा लवकरच निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे हे लवकरच करणार आहेत.