शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

भारत भालके यांना आॅफर, शैला गोडसेंना तयारीचे आदेश; तर परिचारक म्हणतात, आम्हाला पुरस्कृत करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 11:41 AM

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ : उमेदवारीचा तिढा कायम, निवडून येईल तो आपला..

ठळक मुद्देपंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा युतीमध्ये ही गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडेगेल्यावर्षी निवडणूक लढविलेले उमेदवार समाधान आवताडे हे सध्या शिवसेनेत नसल्याने त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न सध्यातरी नाहीराजकीय डावपेचात तरबेज असलेले आ़ भारत भालके हे लोकसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेच्या संपर्कात

पंढरपूर : शिवसेना महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांना पक्षात प्रवेश देऊन विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले असताना आ़ भारत भालके यांना शिवसेनेच्या एका नेत्याने सेनेत येण्याची आॅफर दिली आहे़  परिचारक हे मतदारसंघावरील दावा सोडण्यास तयार नाहीत़ पक्षाकडून उमेदवारी मिळत नसेल तर आम्हाला पुरस्कृत करा, अशा भूमिकेत आहेत़ त्यामुळे उमेदवारीचा तिढा कायम आहे़ बंडखोरी झाल्यास निवडून येईल तो आपला हे सूत्र सत्ताधारी दोन्ही पक्षाकडून ठरण्याची शक्यता आहे.

विधानसभानिवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे़ त्यामुळे सत्ताधारी सेना-भाजप युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादीने हमखास निवडून येण्याची क्षमता असणाºया उमेदवाराचा शोध सुरू केला आहे़ काँग्रेसचे आ़ भारत भालके हे दोन टर्मपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत़  गेल्या वर्षापासून काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक गड ढासळत आहेत़ विद्यमान आमदारांसह आजी-माजी पदाधिकारी सेना- भाजपच्या प्रमुख नेत्यांना भेटून आपल्यासाठी जागा तयार करून घेण्याच्या तयारीत आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा युतीमध्ये ही गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे़ गेल्यावर्षी निवडणूक लढविलेले उमेदवार समाधान आवताडे हे सध्या शिवसेनेत नसल्याने त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न सध्यातरी नाही़  गेल्या दोन वर्षांपासून कुरुल झेडपी गटाच्या सदस्या शैला गोडसे यांना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षात प्रवेश देऊन महिला आघाडीचे जिल्हाप्रमुखपद दिले आणि विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार शैला गोडसे यांनी मतदारसंघात काम सुरू केले आहे़ त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल याची खात्री असताना राजकीय डावपेचात तरबेज असलेले आ़ भारत भालके हे लोकसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेच्या संपर्कात आहेत.

नाही होय म्हणत आ. भारत भालके यांनी मुख्यमंत्र्यांना कारखान्याच्या कामानिमित्ताने भेटल्याचे मान्य केले़ त्यांच्या आडून पक्षप्रवेशाची खलबतेही केल्याची चर्चा आहे़ मुख्यमंत्र्यांनी मात्र पक्षात यायचे असेल तर या, काम करा, अटी घालू नका, असे स्पष्ट सांगितल्याने त्यांनी आपला मोर्चा सेनेकडे वळविला आहे़ ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कासाठी धडपडत असताना सेनेतीलच एका बड्या नेत्याने सेनेत प्रवेश करण्याची आॅफर दिली आहे़ ही आॅफर भारत भालके स्वीकारणार का? असा प्रश्न आहे़परिचारक गटाने पंढरपूर मतदारसंघाचे २५ वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे़ मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर त्यांनी एक टर्म निवडणूक लढविली नाही़ तर दुसºया टर्मला प्रशांत परिचारक यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता़ यावेळी परिचारक गटही या मतदारसंघात सत्तापक्षासोबत राहत निवडणूक लढवायची तयारी करीत आहे़ ही जागा युतीतून सेनेकडे आहे़ परिचारक हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत़ त्यामुळे उमेदवारीची अडचण आहे; मात्र काहीही करून निवडणूक लढवायची असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने पक्षाकडून नसेल तर शिवसेनेकडून पुरस्कृत करा, अशी भूमिका परिचारक गटाने घेतली आहे.

काँग्रेसकडून शिवाजी काळुंगे, वंचितकडूनही चाचपणीकाँग्रेसकडून मंगळवेढ्याचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी काँग्रेसकडे आपला फॉर्म भरून अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे़ त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून स्वत: तयारी केली आहे़ लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास मिळविलेल्या वंचित आघाडीने जातीय समीकरणे जुळवत उमेदवारी चाचपणी सुरू केली असली तरी निश्चित नाव समोर नाही़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण