सावधान...सावधान...सावधान... पुरुषाचा हनी ट्रॅप अन् महिलांना लोन ट्रॅप

By Appasaheb.patil | Updated: October 19, 2022 09:56 IST2022-10-19T09:55:43+5:302022-10-19T09:56:15+5:30

सोलापूर लोकमत न्युज

Beware...beware...beware...honey trap for men and loan trap for women | सावधान...सावधान...सावधान... पुरुषाचा हनी ट्रॅप अन् महिलांना लोन ट्रॅप

सावधान...सावधान...सावधान... पुरुषाचा हनी ट्रॅप अन् महिलांना लोन ट्रॅप

पंढरपूर/सोलापूर : रोज अनेक ठिकाणी अनेक पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकूवून त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करण्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र आता  महिलांना देखील लोन ॲपच्या ट्रॅपमध्ये अडकवून हजारो रुपयांची मागणी होत असल्याची घटना समोर असल्याची माहीती पंढरपूर विभागाचे निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनी दिली आहे.

फेसबुक या सोशल मीडिया वर अनेक पुरुषांना महिलांचे अनोळखी नंबर वरून मॅसेज येतात. पुरुषांशी त्या महिला ओळख करतात, सुरवात ही हॅलो ,हाय ने होते नंतर चॅटिंग द्वारे पुरुषाला मोहात ओढतात काही दिवसातच निवस्त्र व्हिडीओ कॉल करतात. त्यानंतर पुरुषांनाही निवस्त्र व्हायला लावतात. त्या सर्व प्रकाराचे स्क्रीन रेकॉर्डिंग  करुन घेतात. व त्या पुरुषांकडे ते चित्रकरण पाठवून सर्व सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी व भीती दाखवून त्याच्याकडे पैशाची  मागणी करतात. यानंतर अनेकजणांनी त्यांना पैसे दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु पैसे दिले तरी, पुन्हा ते पैसे मागतात. यामुळे अशी फसलेले तरुणनंतर पोलीस ठाण्यात तक्रर येत आहेत.काही तरुण समाजात आपली प्रतिष्ठा ,नावाची बदनामी होईल म्हणून हा प्रकार कोणालाही न सांगता गपचूप सहन करतात.

नुकतेच पंढरपुरातील एका महिलेला व्हाट्सअप या सोशल मीडियावर लोन (कर्ज) हवा आहे का ? असा मेसेज आला. पैशाची गरज असल्याने तिने त्या मॅसेजला उत्तर दिले. त्यानंतर समोरील व्यक्तीने संबंधित महिलेची कागदपत्रे मागवूण घेतली. यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांचा समावेश होता. त्या महिलेस चार हजाराचे कर्ज ही दिले. परंतु समोरच्या व्यतीने संबंधीत महिलेच्या कागदपत्रावरील तिच्या चेहऱ्याचा फोटो वापरुन संगंणकाद्वारे (मॉफ )निवस्त्र फोटो तयार केले. व फोटो त्या महिलेला पाठवले. तुमचे हे निवस्त्र फोटो सोशल मेडियावर व तुमच्या नातेवाईकांनाही पाठवून देईन अशी धमकी देऊन त्या महिलेकडे पैशाची मागणी करत होता. परंतू त्या महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले असून, याबाबत निर्भया पथकाकडे तक्रार दिली असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक  प्रशांत भागवत यांनी सांगितली.

अमिषाला कोणी बळी पडू नये...

सोशल मेडीयावर फसवा योजना टाकून फसवण्याचे प्रकार घडू शकतात. यामुळे अशा प्रकारच्या अमिषाला कोणी बळी पडू नये, अशा प्रकारचा गैर प्रकार कोण्यासोबत झाल्या असल्यास त्यांनी तत्काळ पोलीसांना कळावावे. सर्व प्रकारची खातरजमा झाल्याशिवाय महत्त्वाची कागदपत्रे व फोटो कोणाकडे शेअर करु नये असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

सुंदरीचा फोटो दिसला की फसला...

फेसबुकवरील मॅसेजरच्या डिपीला सुंदर मुलीचा फोटो दिसतो. अन तिकडूनच पहिल्यांदा मॅसेज येतो. यानंतर पुरुषांना हनी ट्रॅप लावला जातो. तर आता महिलांना देखील कर्ज देण्याचे अमिष दाखवून लोन ट्रॅपमध्ये अकडविण्यात येत आहे, यामुळे मोबाईल जपून वापरावे असे पंढरपूर निर्भय पथक प्रमुख प्रशांत भागवत यांनी आवाहन केले आहे.

Web Title: Beware...beware...beware...honey trap for men and loan trap for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.