शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

काय सांगता! चक्क मधमाशांसह बाईकवरून ५ किमी अंतर कापले; पहिल्यांदाच रेस्क्यू केले

By शीतलकुमार कांबळे | Updated: March 18, 2023 13:55 IST

सातव्या मजल्यावरील आगी मोहोळाचे रेस्क्यू ऑपरेशन, किट घालून पाच तासांचे बचाव कार्य, वन विहारात स्थलांतर

सोलापूर - आत्तापर्यंत प्राणी व पक्षांचे रेस्क्यू ऑपरेशनबाबत आपण ऐकले. पण, मधमाशांचे रेस्क्यू करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविले जाण्याचे प्रकार कानावर पडत नाहीत. सोलापुरातील अंत्रोळीकर नगर येथे सातव्या मजल्यावरील मधमाशांचे मोहोळ पाच तासांच्या परिश्रमानंतर हलविण्यात आले.

अंत्रोळीकर नगर येथील एका अपार्टमेंटच्या सातवा मजल्यावर फरहान इनामदार यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या गॅलरीमध्ये २० दिवसांपासून मोहोळ लागले होते. या मोहोळात अंडी होत्या. या मोहोळाला जाळून किंवा केमीकल टाकून काढता येऊ शकले असते. पण, तसे न करता इनामदार कुटुंबियांनी याची माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला दिली. त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा, पप्पू जमादार, तरुण जोशी, आदित्य घाडगे यांनी बचावकार्य पार पाडले.असे हलविले मोहोळएका पुठ्ठ्याने हळूवारपणे पोळे काढत ते बॉक्समध्ये ठेवण्यात आले. काही वेळात मधाच्या पोळ्यांसह मधमाशा बॉक्समध्ये आल्या. त्यानंतर बॉक्समध्ये हवा जाण्यासाठी थोडी जागा सोडून बॉक्स चिकटपट्टीने बंद करण्यात आला. बाईकवरून मधमाशांचा बॉक्स पाच किलोमीटर अंतरावरील सिद्धेश्वर वन विहार येथे नेण्यात आला. तिथे पाण्याची टाकी असलेल्या थंड ठिकाणी उंचीवर बॉक्स उघडून पोळे ठेवण्यात आले. काही दिवसात मधमाशी दुसरीकडे जागा पाहून नवीन पोळे तयार करतील, असे भरत छेडा यांनी सांगितले.