शिवी दिल्याचे सांगितल्यावरून मारहाण; जाताना दुचाकीही जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:19 IST2020-12-23T04:19:40+5:302020-12-23T04:19:40+5:30

यातील जखमी नागेश सुरवसे (वय ३५, रा. ताडसौंदनेरोड, बार्शी) यास येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबानीवरून दादा ...

Beating for swearing; The bike also caught fire on the way | शिवी दिल्याचे सांगितल्यावरून मारहाण; जाताना दुचाकीही जाळली

शिवी दिल्याचे सांगितल्यावरून मारहाण; जाताना दुचाकीही जाळली

यातील जखमी नागेश सुरवसे (वय ३५, रा. ताडसौंदनेरोड, बार्शी) यास येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबानीवरून दादा गायकवाड (रा. रिंगरोड, सुभाषनगर, बार्शी) यांच्याविरुद्ध भादंवि ३०७, ४३५, आर्म ॲक्ट कलम ४ नुसार व बी.पी. कलमानुसार गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यादिवशी दादा गायकवाड यांनी काम असल्याच्या कारणावरून त्याला फोन करून घरी बोलावून घेतले. त्यावेळी जखमी दुचाकीवरून आला होता. त्याला विचारताच आरोपीने जखमीस मी शिव्या दिल्याचे का सांगितले असे म्हणत गंभीर जखमी केले. त्यातून तो पळून जाताना तलवार घेऊन पाठलाग केला. रिंगरोडवर येऊन मित्राच्या मदतीने जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल झाला. दरम्यान, आरोपीने जखमीची रिंगरोडवर लावलेली दुचाकीही जाळून टाकल्याचे तक्रारीत दाखल केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल ननवरे करत आहेत.

----

Web Title: Beating for swearing; The bike also caught fire on the way