शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमवीरांनो सावधान; ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवल्यास तीन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:05 IST

एकतर्फी प्रेमवीरांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

ठळक मुद्देमुली व महिलांशी जवळीक साधण्यासाठी मोबाईलचा वापर मोबाईलवर संपर्क साधण्याचे प्रकार वाढले कोणी जाणीवपूर्वक मोबाईल नंबर मिळवून जवळीक साधण्याचा प्रयत्न

संताजी शिंदेसोलापूर :  एखाद्या मुलगी किंवा महिलेच्या मोबाईलवर एकतर्फी प्रेमातून ‘आय लव्ह यू’चा मेसेज (संदेश) पाठवल्यास संबंधितास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. मुलीने पोलिसात तक्रार केल्यास तत्काळ भादंवि ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल केला जातो. 

सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. सोबत व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप सर्रास वापरले जात आहे. मुलींच्या मोबाईल नंबरवरचा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहणे, चॅटिंग करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर किंवा पूर्वीपासून मोबाईलमधील मेसेजच्या माध्यमातून एखाद्या मुलीस किंवा महिलेस थोडक्यात संदेश पाठवला जातो. फोनवर बोलता येत नसेल तर टायपिंग करून संवाद साधला जातो. सध्या मोबाईलच्या जमान्यात प्रत्येक व्यक्ती दररोज कोणाशी ना कोणाशी संपर्क साधत असते. शाळा, कॉलेजमधील मुले, मुलीही मोबाईलचा वापर करीत आहेत. मोबाईलमुळे जग जवळ आले आहे. संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. आधुनिक अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल आल्याने कामे सोपी झाली आहेत. व्यक्ती कितीही व्यस्त असली तरी ती आपल्या व्यक्तीला मेसेजच्या माध्यमातून संपर्क करत असते. एकावेळी अनेक कामे करणे आता सहज शक्य झाले आहे. 

मोबाईलचे अनेक फायदे असले तरी त्याचे दुष्परिणामही तितकेच पुढे येत आहेत. मुली व महिलांशी जवळीक साधण्यासाठी मोबाईलचा वापर केला जात आहे. मैत्रीचे मेसेज पाठवत असताना अचानक एखादा भावनिक करणारा संदेश पाठवला जातो. मुलीचा किंवा महिलेचा प्रतिसाद पाहून पुढे आणखी काही मेसेज पाठवले जातात. काही गोष्टी मोबाईलवर बोलता येत नाहीत, मात्र मेसेजच्या माध्यमातून त्या व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. एकतर्फी प्रेमातून भावना अनावर झाल्यास मुलीस किंवा महिलेस ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करतात. असा मेसेज आल्यानंतर अचानक मुलीस किंवा महिलेस वाईट वाटते. असे कृत्य थांबवण्यासाठी संबंधित महिलेने जर पोलिसात तक्रार दिली तर मेसेज पाठवणाºयावर भादंवि कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. या कलमाअंतर्गत न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला किंवा तरुणाला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. 

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर चांगल्या कामासाठी करा : अरुण फुगे - मोबाईलवर संपर्क साधण्याचे प्रकार वाढले आहेत. कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी व अन्य क्षेत्रात मित्र, मैत्रिणी होतात. व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर किंवा मोबाईल मेसेजच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क ठेवतात. कोणी जाणीवपूर्वक मोबाईल नंबर मिळवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असतो. बहुतांश महिला, मुली काही लोकांना टाळतात. मात्र सीम कार्ड बदलून किंवा अज्ञात नंबरवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. अशामध्ये जर एकतर्फीमधून ‘आय लव्ह यू’सारखे मेसेज पाठवले तर महिलेच्या मनास लज्जा वाटेल, असे कृत्य घडते. याची तक्रार आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी