सावधान ! वादग्रस्त राजकीय पोस्टवर आता ग्रुपमधील पोलीस मित्रांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:47 AM2019-03-18T11:47:55+5:302019-03-18T11:49:52+5:30

संताजी शिंदे  सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियावर पोलीस ...

Be careful! Police Group's look at the controversial political post now in the group | सावधान ! वादग्रस्त राजकीय पोस्टवर आता ग्रुपमधील पोलीस मित्रांची नजर

सावधान ! वादग्रस्त राजकीय पोस्टवर आता ग्रुपमधील पोलीस मित्रांची नजर

Next
ठळक मुद्देवादग्रस्त पोस्ट टाकल्यास ग्रुप अ‍ॅडमिन व संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई होऊ शकतेसोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेलने शहरातील विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व फेसबुक सारख्या सोशल मीडियावर लक्ष ठेवले

संताजी शिंदे 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियावर पोलीस आणि त्यांचे मित्र सहभागी झाले आहेत. वादग्रस्त पोस्ट टाकल्यास ग्रुप अ‍ॅडमिन व संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई होऊ शकते. 

सध्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे, प्रत्येक पक्ष आपल्या परीने उमेदवार निवडीच्या कामाला लागले आहेत. उमेदवार कोण असणार? कसा असणार, जातीय समीकरण आदी विविध बाबी दररोज समोर येत आहेत. 

सध्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियावर प्रत्येक उमेदवाराची शक्यता, शाश्वती, पक्षाचा इतिहास आदी प्रकारची सकारात्मक व नकारात्मक माहिती फोटोसह प्रसिद्ध केली जात आहे. एखाद्या उमेदवाचे कार्य, निष्क्रियता आदी बाबी मांडून प्रचारही केला जात आहे. यातच एखाद्या समाजाच्या भावना दुखावणाºया पोस्टही टाकल्या जातात. या प्रकारामुळे पक्ष व जातीय तेढ निर्माण होऊन समाजात वाद निर्माण होऊ शकतो. 

प्रक्षोभक वक्तव्य किंवा आक्षेपार्ह मजकूर टाकून चिथावणी देणाºया घटना घडू शकतात. हा प्रकार सर्रास सोशल मीडियावरून होऊ शकतो. महापुरुषांवर आक्षेपार्ह लिखाण करून सामाजिक व धार्मिक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. हा धोका ओळखून सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेलने शहरातील विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व फेसबुक सारख्या सोशल मीडियावर लक्ष ठेवले आहे. बहुतांश ग्रुपमध्ये पोलीस कर्मचारी अ‍ॅड झाले आहेत.

पोलिसांमार्फत बहुतांश समाजाच्या ग्रुपमध्ये पोलीस मित्र अ‍ॅड आहेत. हे लोक अशा पोस्टवर लक्ष ठेवून आहेत. आक्षेपार्ह मजकूर आल्यास ते तत्काळ सायबर सेलच्या लक्षात आणून देणार आहेत. सायबर सेलच्या वतीने तत्काळ संबंधित ग्रुप अ‍ॅडमिन व पोस्ट करणाºया व्यक्तीस पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतील. पहिल्यांदा त्यांना समज दिली जाईल किंवा या पोस्टबद्दल जर कोणी तक्रारी केली तर मात्र संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल असे सायबर सेलच्या वतीने सांगण्यात आले. 

जबर शिक्षेची तरतूद...
- आक्षेपार्ह विधान किंवा मजकूर असलेला फोटो, व्हिडीओ प्रसारित करणाºयाविरुद्ध आयटीसी कलम ५00 प्रमाणे गुन्हा दाखल करता येतो. अश्लील विधान किंवा अन्य आक्षेपार्ह मजकूर असेल तर पहिल्या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा व दोन लाखांचा दंड होऊ शकतो. हाच गुन्हा जर पुन्हा झाला तर संबंधितास ७ वर्षांची शिक्षा ५ लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा लागू शकते. युवकांनी व नागरिकांनी अशा पोस्टपासून दूर रहावे, त्याला फॉरवर्ड करणे किंवा लाईक करणे हा सुद्धा गुन्हा ठरू शकतो. 

Web Title: Be careful! Police Group's look at the controversial political post now in the group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.