नवजात अर्भकाला बावीत मंदिराबाहेर सोडून फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:26 IST2021-07-14T04:26:13+5:302021-07-14T04:26:13+5:30

माढा : बावी येथील सिद्धेश्वर मंदिरात अनोळखी आठ ते दहा लोकांनी पुरुष जातीचे अर्भक ठेवून पसार झाल्याची घटना सोमवारी, ...

Bavit leaves newborn baby outside temple | नवजात अर्भकाला बावीत मंदिराबाहेर सोडून फरार

नवजात अर्भकाला बावीत मंदिराबाहेर सोडून फरार

माढा : बावी येथील सिद्धेश्वर मंदिरात अनोळखी आठ ते दहा लोकांनी पुरुष जातीचे अर्भक ठेवून पसार झाल्याची घटना सोमवारी, १२ जुलै रोजी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, माढा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

पाेलीस सूत्राकडील माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या कारमधूनमधून चार पुरुष व एक महिला बावी येथे आले. सिद्धेश्वर मंदिरासमोर उतरले. साधारण दहा दिवसाचे एक अर्भक मंदिरात नेऊन त्या ठिकाणी ठेवून घाई गडबडीत कुर्डुवाडीच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळात स्थानिक नागरिकांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी संबंधित पोलीसपाटलाशी संपर्क साधून याची माहिती दिली. यानंतर हे अर्भक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर त्याला सोलापूर येथील बालसुधारगृहात रवाना करण्यात आले. या अर्भकाला प्रकृतीच्या आनुषंगाने सोलापूर येथे रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याबाबतीत पोलीसपाटील अनिल मोरे यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Web Title: Bavit leaves newborn baby outside temple