बार्शीत दाळ मिलचे गोदाम अन्‌ तिजोरी फोडून रोकडसह अडीच लाखांचा ऐवज चोरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:15 IST2021-06-23T04:15:55+5:302021-06-23T04:15:55+5:30

बार्शी : बार्शी तालुक्यातील गताचीवाडी हद्दीत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील दाळ मिलच्या कार्यालयाचे कुलूप चोरट्यांनी तोडून ...

Barshit dal mill warehouse and safe vandalized, Rs 2.5 lakh stolen along with cash | बार्शीत दाळ मिलचे गोदाम अन्‌ तिजोरी फोडून रोकडसह अडीच लाखांचा ऐवज चोरला

बार्शीत दाळ मिलचे गोदाम अन्‌ तिजोरी फोडून रोकडसह अडीच लाखांचा ऐवज चोरला

बार्शी : बार्शी तालुक्यातील गताचीवाडी हद्दीत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील दाळ मिलच्या कार्यालयाचे कुलूप चोरट्यांनी तोडून तिजोरीतील १ लाख ६४ हजाराची रोकड आणि ८५ हजार ५०० रुपयांचे ४७ मुगाचे कट्टे असा २ लाख ४९ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली. २२ जून रोजी ही घटना घडली. याबाबत अशोक शहा यांनी तालुका पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी भादवि ३८० व ४६१ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

पोलीस सूत्रांनुसार बार्शी आगळगाव रोडवरील गाताचीवाडी शिवारात तीन औद्योगिक वसाहतीत किरण इंडस्ट्रीज नावाची दाळ मिल आहे. यासाठी लागणारे कडधान्य ठेवण्यासाठी येथेच एक गोडाऊन आहे. त्याच्या जवळच डाळ मिलच्या व्यवहारासाठी कार्यालय आहे. याच्या सुरक्षेसाठी विठोबा फराडे हा सुरक्षा गार्ड आहे. २१ जून रोजी दिवसभर मिलचे काम करून दोन्हीकडे कुलूप लावून फिर्यादी घरी गेले होते. रात्रीत कुलूप तोडून चोरी झाल्यानंतर मंगळवारी सकाळी गार्डच्या मुलाने मोबाइलवरून कुलूप तोडल्याची माहिती दिली.

चोरीची घटना समजताच फिर्यादीने येऊन पाहणी करताना गोडाऊनमधील मुगाचे ६० किलो वजनाचे ४७ कट्टे तर कार्यालयाच्या तिजोरीतून १ लाख ६४ हजारांची रोकड चोरून नेल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. तपास सहायक फौजदार रफिक शेख करत आहेत.

-----

२२बार्शी-चोरी

Web Title: Barshit dal mill warehouse and safe vandalized, Rs 2.5 lakh stolen along with cash