बार्शी गाव मोठ्ठ; पण कर भरण्यात मागं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:25+5:302021-03-07T04:20:25+5:30

बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी अन्‌ ‘अ’ दर्जाची नगरपालिका असलेल्या बार्शी नगरपालिका प्रशासनाकडून मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांना घरपट्टी ...

Barshi village large; But ask for taxes! | बार्शी गाव मोठ्ठ; पण कर भरण्यात मागं!

बार्शी गाव मोठ्ठ; पण कर भरण्यात मागं!

Next

बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी अन्‌ ‘अ’ दर्जाची नगरपालिका असलेल्या बार्शी नगरपालिका प्रशासनाकडून मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांना घरपट्टी आणि नळपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, अद्यापही बार्शीकरांकडून पालिकेचे सुुमारे २४ कोटींची थकबाकी वसूल होणे बाकी आहे़ यासाठी पालिकेने १३ पथकांची नियुक्ती केली आहे. मार्चच्या पाहिल्या आठवड्यात पाच दिवसात ४८ लाख रुपये वसूल झाले आहेत.

ज्या नागरिकांची थकबाकी, बाकी आहे अशांनी तत्काळ आपली बाकी भरली नाही तर नळ पाणी पुरवठा खंडित करण्याची तसेच गाळे सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे. या थकबाकीदारांच्या यादीत अनेक धनदांडग्या लाेकांचीच संख्या जास्त आहे. बार्शी नगरपालिका प्रशासनाकडील आकडेवाडीनुसार ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची संख्या तब्बल १,६६१ एवढी असून यांच्याकडून १७ कोटी ११ लाख ८३ हजार ९०० रुपये येणे बाकी आहे. तर, २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांची संख्या २,२१६ असून, त्यांच्याकडून ७ कोटी ७९ लाख ३१ हजार ३०० रुपये एवढी रक्कम येणे बाकी आहे.

एकंदरीत एकूण रकमेची बेरीज केल्यास, जवळपास २५ कोटी रुपयांच्या घरात थकबाकी येणे बाकी आहे. गेल्या पाच दिवसांपासून या वसुलीसाठी पालिकेने चार जणांचे एक असे १३ पथके नियुक्त केली आहेत. ही पथके करवसुली निरीक्षक व्ही़ एस़ पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी तसेच दुकानी जाऊन वसुुलीचे काम करीत आहेत़ मुख्याधिकारी दगडे पाटील या वसुलीकडे लक्ष ठेवून आहेत़

---

असा आहे थकीत बिलाचा तपशील

एकूण मागणी आहे ४६ कोटी ५५ लाख. तर एकूण वसुुलीची मागणी ही ४६ कोटी ५५ लाख एवढी आह़े त्यात ३३ कोटी ही मूळ रक्कम आहे. त्यावरील व्याजाची रक्कम ही १३ कोटी एवढी झाली आहे़ यामध्ये यावर्षीच्या १६ कोटी चालू बाकीचाही समावेश आहे़ तर २९ कोटी रुपयांत थकबाकी आणि व्याज याचा समावेश आहे़ आतापर्यंत यातील ३ कोटी २० लाख रुपये जमा झाले आहेत़ बार्शी तहसील कार्यालयाकडे ११ लाख रुपये, पंचायत समितीकडे २ लाख तर आयटीआय कॉलेजकडेही ७० हजार एवढी थकबाकी आहे़ ज्यांच्याकडे बाकी किंवा थकबाकी आहे अशांना पैसे भरण्यासाठी केवळ २४ दिवस शिल्लक आहेत़ कारवाई टाळण्यााठी चालू वर्षाचा कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़

-----

मोबाईल टॉवरचेही बिल थकले

शहरातील काही जागा मालकांकडे मोबाईल कंपन्यांचे टॉवर बसविण्यात आले आहे. या टॉवर कंपन्यांकडून ते मासिक भाडेही घेतात. मात्र, त्यांच्याकडून घरपट्टी आणि थकबाकी भरण्यात येत नाही. त्यामुळे, या जागा मालकांनीही लवकरात लवकर थकबाकी भरावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच दगडे पाटील यांनी दिला आहे.

Web Title: Barshi village large; But ask for taxes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.