बार्शीचे खासदार, आमदार कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST2021-04-10T04:21:58+5:302021-04-10T04:21:58+5:30

यापूर्वी खासदार यांचे बंधू जयराजे हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली त्यात पती -पत्नी पॉझिटिव्ह आले ...

Barshi MP, MLA Corona Positive | बार्शीचे खासदार, आमदार कोरोना पॉझिटिव्ह

बार्शीचे खासदार, आमदार कोरोना पॉझिटिव्ह

यापूर्वी खासदार यांचे बंधू जयराजे हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली त्यात पती -पत्नी पॉझिटिव्ह आले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वीय सहायक संतोष खोचरे हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना पॉलिटेक्निक कॉलेज येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांचीही प्रकृती चांगली आहे.

बार्शी शहर तालुक्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून अनेक कुटुंबाच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने येथील स्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन मास्क सॅनिटायझर, सामाजिक अंतराचा वापर करावा तसेच लसीकरण करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तत्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे , असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केले आहे.

राऊत कुटुंब बाधित

आमदार राजेंद्र राऊत यांच्या पत्नी कविता राऊत, त्यांचे बंधू विजय राऊत यांच्या पत्नी कोमल राऊत व त्यांची दोन मुले देखील पॉझिटिव्ह आली आहेत. त्यानंतर आमदार राऊत यांची टेस्ट पॉझिटिव्ह आले.

Web Title: Barshi MP, MLA Corona Positive