बार्शीत घर फोडून लाखाच्या रोकडसह दागिने पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:23 IST2021-02-16T04:23:43+5:302021-02-16T04:23:43+5:30
याबाबत सूरज सुनील डाके (वय २३, रा. लक्ष्मीनगर) बार्शी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ...

बार्शीत घर फोडून लाखाच्या रोकडसह दागिने पळवले
याबाबत सूरज सुनील डाके (वय २३, रा. लक्ष्मीनगर) बार्शी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी आईवडिलांसह एकत्रित रहात असून, परांडा येथे आजी मयत झाल्याने गेले होते. जाताना त्यांनी जमीन विक्री करून आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपये व अडीच तोळ्यांचे सोन्याचे गठण तिजोरीच्या कपाटात ठेवले होते. सर्व विधी संपवून सोमवारी दुपारी घरी आल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडलेला दिसला. घरात जाऊन पाहणी केली असता ड्रावरमध्ये ठेवलेले एक लाख रुपये व अडीच तोळ्यांचे गठण चोरून नेल्याचे दिसले. त्यानंतर शहर पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करत आहेत.
--